Rangpanchami 2026: रंगपंचमीच्या दिवशी त्वचा खराब होण्याचं टेन्शन येतंय? मग आजच करा 'हे' स्किनकेअर रुटीन फॉलो
esakal March 01, 2026 10:45 PM

Pre & Post Rangpanchami Skincare Tips: रंगपचमी म्हणजे रंगांचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण. नवे ऋतू, नवे रंग आणि मनमोकळा आनंद, सगळं काही छानच! पण या सगळ्या मजेत आपल्या त्वचेकडे मात्र बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं. त्यात बाजारात मिळणाऱ्या कृत्रिम रंगांमध्ये असलेले केमिकल त्वचेचं नैसर्गिक मॉईश्चर काढून घेतात. परिणामी कोरडेपणा, खाज, लालसरपणा किंवा अॅलर्जीची सुद्धा शक्यता वाढते.

पण मग यावर उपाय असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. अशावेळी त्वचेची आधीपासूनच काळजी घेतली, तर रंग खेळूनही तुमची त्वचा निरोगी आणि तजेलदार राहू शकते. तुम्हाला पण निश्चिंतपणे रंगपंचमी खेळायची असेल तर पुढे दिलेलं ७ स्टेप स्किनकेअर रुटीन तुम्हाला नक्की मदत करेल.

रंगपंचमीपूर्वी स्किनकेअर का महत्त्वाचं आहे?

कृत्रिम रंगांमुळे त्वचेच्या संरक्षणात्मक थरावर (स्किन बॅरियर) परिणाम होतो.

  • रासायनिक घटक त्वचेतील नैसर्गिक तेल कमी करतात.

  • सूर्यप्रकाश आणि पाण्याचा जास्त संपर्क त्वचा कोरडी करतो, टॅनिंग आणि पिग्मेंटेशन वाढवतो.

  • आधीची काळजी घेतली तर नंतर रंग काढताना होणारे नुकसान टाळता येते.

म्हणूनच नंतर उपचार करण्यापेक्षा आधीच संरक्षण करणं हे नेहमीच फायदेशीर ठरते.

Festival Skincare Tips: दिवसभर मेकअपमुळे त्वचा खराब झालीये? रात्री झोपताना तिला द्या थोडं प्रेम! रंगपंचमीपूर्वी त्वचेची काळजी घेण्याच्या ७ सोप्या स्टेप्स १. सौम्य क्लेन्सिंगने सुरुवात करा

त्वचा स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. फेस क्लींझरने चेहरा धुवा, जेणेकरून धूळ, तेलकटपणा आणि घाण निघून जाईल. यामुळे त्वचा पुढील स्टेप्ससाठी तयार होते.

२. हलकं एक्सफोलिएशन (१–२ दिवस आधी)

रंगपंचमीच्या एक-दोन दिवस आधी सौम्य स्क्रब वापरा. यामुळे मृत पेशी निघून जातात आणि त्वचा मऊ होते. मात्र होलीच्या दिवशी स्क्रब करू नका, कारण त्यामुळे त्वचा अधिक संवेदनशील होऊ शकते.

५० व्या वर्षीही तरुण दिसण्यासाठी नवा फंडा? ‘फेशियल ड्राय ब्रशिंग’मागचं खरं सत्य काय? जॉलाइन सुधारण्यासाठी... ३. योग्य मॉइश्चरायझर वापरा

कोरडी त्वचा रंग पटकन शोषून घेते. त्यामुळे हलकं पण पोषण देणारं मॉइश्चरायझर वापरा. हे त्वचेला ओलावा देतं आणि रंगांचा थेट परिणाम कमी करतं.

४. सनस्क्रीन कधीही चुकवू नका

बाहेर रंगपंचमी खेळणार असाल तर सनस्क्रीन अत्यावश्यक आहे. पाणी आणि घाम सहन करणारा, जास्त एसपीएफ असलेला सनस्क्रीन चेहरा, मान, हात-पाय यावर लावा. यामुळे उन्हामुळे होणारे टॅन आणि जळजळ टाळता येते.

५. तेलाचा हलका थर द्या

चेहरा आणि शरीरावर थोडंसं तेल लावल्याने त्वचेवर एक संरक्षणात्मक थर तयार होतो. नारळाचं, बदामाचं किंवा जोजोबा तेल वापरू शकता. विशेषतः कोरड्या त्वचेसाठी ही पायरी खूप उपयुक्त आहे.

६. ओठांची काळजी घ्या

ओठांची त्वचा खूप नाजूक असते. त्यामुळे होली खेळण्याआधी ओठांवर चांगला लिप बाम लावा. यामुळे ओठ कोरडे पडत नाहीत आणि रंगांपासून संरक्षण मिळतं.

महागड्या ट्रीटमेंट्स कशाला? गुलाबपाण्याने मिळवा पार्लरसारखा नैसर्गिक निखार अन् काचेसारखी चमक! ७. नखांचं संरक्षण विसरू नका

नखांवर रंग पटकन बसतात. त्यामुळे नखांना पारदर्शक नेल पॉलिश लावा किंवा नखांच्या कडांना तेल लावा. नखे आधीच कापून ठेवली तर रंग निघणं सोपं जातं.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.