आर्य चाणक्य हे एक महान अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये माणसाच्या आयुष्यात पैशांचं किती महत्त्व असू शकतं, याबाबत चाणक्य यांनी अनेक दाखले दिले आहेत. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात पैसा नावाची गोष्टी ही सर्वात महत्त्वाची असते. तुमच्याकडे जर धन असेल संपत्ती असेल तर परके लोक देखील तुमचे असतात. मात्र जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुमचे नातेवाईक देखील तुमची साथ सोडतात, त्यामुळे प्रत्येकाने पैशांची बचत केलीच पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चाणक्य पुढे म्हणतात, की जगात अशी एकही गोष्टी नाही की जी तुम्ही पैशांनी खरेदी करू शकत नाहीत. तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुमच्यावर कोणतंही संकट येणारच नाही, आणि समजा आलंच तर तुम्ही त्याला पैशांच्या जोरावर सहज नष्ट करू शकतात. त्यामुळे पैसा हा माणसाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला श्रीमंत व्हायच असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
पैशांची बचत – चाणक्य म्हणतात पैसा ही माणसाची गरज आहे. जर माणसाकडे पैसा नसेल तर तो आयुष्यात कोणतीही गोष्ट करू शकत नाही. आपल्या कुटुंबाचा, मुलाबाळाचा, पत्नीचा सांभाळ करण्यासाठी प्रत्येकाला पैशांची गरज असते. त्यामुळे तुम्ही महिन्याला जे पैसे कमवत असाल त्यातील 25 टक्के रक्कम तरी तुम्ही बचत केलीच पाहिजे.
पैशांची गुंतवणूक – चाणक्य म्हणतात तुम्ही बचत केलेले पैसे एकाच जागी ठेवले तर त्यामध्ये कधीही वाढ होणार नाही, तर त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, कारण त्यामुळे मिळणाऱ्या परताव्यातून तुमचा पैसा हा वाढत जाईल. मात्र गुंतवणूक करताना नेहमी सुरक्षित मार्गाला प्राधान्य द्या, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
दान – चाणक्य म्हणतात तुम्ही जेव्हा पैसा कमावतात तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण समाजाचं देखील काहीतरी देणं लागतो. त्यामुळे तुम्ही जे पैसे कमावले आहेत, त्यातून काही पैशांचं गरजू लोकांना दान करा, त्यामुळे तुम्हाला बरकत प्राप्त होईल.
योग्य मार्गाने पैसा कमवा – चाणक्य म्हणतात तुम्ही जर चुकीच्या मार्गाने पैसा कमावला तर कदाचित तुम्ही कमी कालावधीत खूप पैसा कमवाल मात्र असा पैसा हा दीर्घकाळ तुमची साथ देणार नाही, त्यामुळे पैसा हा योग्य मार्गानेच कमावा.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)