पंचांग -
गुरुवार : चैत्र शुद्ध १५, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ६.२९ सूर्यास्त ६.४७, चंद्रोदय सायंकाळी ७.०७ चंद्रास्त सकाळी ७.०३, हनुमान जयंती, वैशाख स्नानारंभ, पौर्णिमा समाप्ती ७.४२, पिसाह - ज्यू, आयंबील ओळी समाप्ती - जैन, भारतीय सौर चैत्र १२ शके १९४८.
दिनविशेष -
१९९८ - कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या पहिल्या निजामुद्दीन-तिरुअनंतपुरम या राजधानी एक्स्प्रेसचा शुभारंभ दिल्लीतून झाला.
२००३ - लष्करी उपग्रह असलेल्या ‘मोलन्या एम’ या रॉकेटचे रशियाने यशस्वी प्रक्षेपण केले.
२०११ - मोहाली येथे श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील अंतिम विश्वकरंडक क्रिकेट सामन्यात टीम इंडियाने विश्वविजेतेपद जिंकले.