Maharashtra Live News Update : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट, अनेक ठिकाणी गारपीठ
Saam TV April 02, 2026 10:45 AM
Latur : लातूर जिल्ह्यात अवकाळी आणि गारपीटी, शेती पिकांचे मोठे नुकसान, तिसऱ्यांदा अवकाळीचा लातूर जिल्ह्याला तडाका

रात्री झालेल्या वादळीवारा आणि अवकाळी पावसामुळे लातूरच्या ग्रामीण भागात शेती पिकांचे मोठं नुकसान झाल आहे, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा, यासह आंबा फळबागेचे मोठे नुकसान झाल आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे आडवी पडली आहेत,तर रेनापुर तालुक्यातील काही भागातील विद्युत पुरवठा देखील रात्रीपासून खंडित आहे. दरम्यान लातूर शहरात देखील मध्यरात्री तुफान पाऊस झाला आहे, अवकाळी मुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झाल आहे.

अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्याला बसला; दोन एकरांवरील कांदा व पपईचे मोठे नुकसान....

मावळ तालुक्यातील देहूगाव देहूरोड येळवाडी या मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात गारांसह अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला आहे. येलवाडीच्या शशिकांत काळोखे यांना तर फारच मोठा उसाचा फटका बसला आहे. यांच्या दोन एकरांतील कांदा पूर्णतः खराब झाला आहे. काळोखे यांनी आंतरपीक म्हणून पपईचे पीक घेतले होते मात्र गारांच्या मारामुळे तेही पूर्ण जमीनदस्त झाले आहे. कांदा पूर्ण तयार होऊन काढणीस आलेला होता मात्र अवकाळी पावसाने तोंडाचा घास फिरवून घेतला त्यामुळे अक्षरशा रडण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे. शेतीसाठी लागणारी खतं, कामगारांची मजुरी तसेच तीन महिने शेतात राबून कांद्यासाठी केलेले शेतकऱ्याचे कष्ट वाया गेले आहेत. आंतर पिकासाठी त्यांनी पपईचे एक रोप वीस रुपयांना घेतले होते, अशा सुमारे दोन हजार रोपांचे गारपिटीमुळे नुकसान झाले आहे.

विहीरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान

राजापूर तालुक्यातील जुवाठी शिर्केवाडीतील रामचंद्र नारायण भारती यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने जीवनदान दिलेय. जुवाठी शिर्केवाडीतील रामचंद्र नारायण भारती यांच्या विहिरीत बिबट्या पडला असल्याची माहिती वनविभागाला मिळाली तात्काळ वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली.जवळपास 40 फूट खोल विहीरीत हा बिबट्या पडला होता. या बिबट्याला सुखरूप पिंजऱ्यात जेरबंद करून बाहेर काढण्यात आले. बिबट्या हा मादी जातीचा असून वय सुमारे दीड ते दोन वर्ष आहे.वैद्यकीय तपासणीनंतर या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Junnar : कुकडी पुलावर बिबट्याचा मुक्त संचार; जुन्नरमध्ये भीतीचे वातावरण

जुन्नर तालुक्यातील बेळेआळी रोडवरील कुकडी नदीच्या पुलावर बिबट्याचा मुक्त संचार पुन्हा एकदा समोर आला आहे. रात्रीच्या वेळी हा बिबट्या पुलावरून निवांत फिरताना कॅमेरात कैद झाला असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, या भागात बिबट्यांचा वावर वाढत असल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट, अनेक ठिकाणी गारपीठ

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रावर अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, सोलापूर, अहिल्यानगरसह राज्यात गारपिठासह पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा संकटात आला आहे. हातातोंडाशी आलेलं पिक गेल्यामुळे शेतकरी राजा हताश झाला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.