Dhurandhar 2 Box Office Collection Day 14: रणवीर सिंह (Ranveer Singh) स्टार सिनेमा 'धुरंधर : द रिवेंज'नं (Dhurandhar The Revenge) बॉक्स ऑफिस (Dhurandhar 2 Box Office Collection) गाजवलंय. सध्या 'धुरंधर 2'नं (Dhurandhar 2) बॉक्स ऑफिसवर (BO Collection) ताबा मिळवलाय. हा सिनेमा 2026 मधील जगभरातील प्रदर्शित झालेल्या सर्वात मोठा चित्रपट ठरलाय. हा स्पाय-थ्रिलर चित्रपट (Spy Thriller Film) प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवत असून, सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी कायम आहे. हा सिक्वेल जागतिक बॉक्स ऑफिसवर (Dhurandhar 2 Worldwide BO Collection) नवे विक्रम नोंदवतोय आणि दुसऱ्या आठवड्यातही त्याची घौडदौड कायम आहे. 'धुरंधर 2'नं दुसऱ्या बुधवारी, म्हणजेच 14व्या दिवशी किती कमाई केली?
रणवीर सिंहच्या या स्पाय-थ्रिलर सिनेमाची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवरील अनेक विक्रम मोडलेत. दुसऱ्या आठवड्यात कमाईत थोडी घट दिसून आली असली, तरी दोन आठवडे पूर्ण होण्याआधीच या सिनेमानं भारतीय बॉक्स ऑफिसवर 900 कोटींचा टप्पा पार केलाय.
'धुरंधर 2'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या आकडेवारीनुसार, 'धुरंधर 2'नं पहिल्या आठवड्यात 674.17 कोटींची कमाई केली होती. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, सिनेमानं चौदाव्या दिवशी सुमारे 20 कोटींची कमाई केलीय. त्यामुळे भारतातील या सिनेमाचं एकूण नेट कलेक्शन 920.02 कोटींवर पोहोचलंय, तर ग्रॉस कलेक्शन 1101.47 कोटींवर गेलंय.
'धुरंधर 2'नं आतापर्यंत आपल्या प्रीक्वेलसह अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांचं लाईफटाईम कलेक्शन मागे टाकलंय. या सिनेमानं 'केजीएफ: चैप्टर 2' (859.70 कोटी), 'आरआरआर' (782.20 कोटी) आणि 'कल्कि 2898 एडी' (646 कोटी) यांचे रेकॉर्ड्स मोडले आहेत. अशातच आता या सिनेमाच्या निशाण्यावर 'बाहुबली 2'चं 1030.42 कोटींचं लाईफटाईम कलेक्शन आहे. 14 दिवसांत 920 कोटींची कमाई झाल्यामुळे हा विक्रम मोडण्यासाठी सिनेमाला आणखी सुमारे 110 कोटींची गरज आहे. हा टप्पा 'धुरंधर 2' कधी गाठतो? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
दरम्यान, 'धुरंधर 2'मध्ये रणवीर सिंह पुन्हा एकदा हमजा अली मदारीच्या भूमिकेत झळकला आहे. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' सिनेमातील कथेला 'धुरंधर 2'मध्ये पुढे नेण्यात आलंय. 'धुरंधर 2'मध्ये रणवीर सिंहसोबतच सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, आर. माधवन, संजय दत्त आणि राकेश बेदी महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.