LPG Crisis : होर्मुझमधून दररोज केवळ 15 जहाजांना जाण्याची परवानगी,  इराणने घातल्या कडक अटी, पुरवठा साखळीवर परिणाम
एबीपी माझा वेब टीम April 10, 2026 02:13 AM

Iran on Hormuz Vessels :  अमेरिका-इराण शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. रशियाची सरकारी वृत्तसंस्था TASS च्या ताज्या अहवालानुसार, इराण आता होर्मुझमधून दररोज केवळ १५ जहाजांनाच जाण्याची परवानगी देणार आहे. इराणच्या या निर्णयाचा भारताला होणाऱ्या एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. वाहतुकीवर निर्बंध घालण्याच्या इराणच्या निर्णयामुळे जागतिक वाहतूकदारांमध्येही चिंता वाढली आहे.

भारत सरकारचं म्हणणं काय?

देशातील एलपीजी, कच्चे तेल आणि रासायनिक उत्पादनांच्या पुरवठ्याबाबत पेट्रोलियम मंत्रालयाने म्हटले आहे की, देशातील एलपीजी संकटाचा सामना करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सध्या देशात एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. मंत्रालयाने माहिती दिली की, देशात दररोज 58 लाखांहून अधिक घरगुती एलपीजी सिलिंडरचे वितरण केले जात आहे. याशिवाय, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची उपलब्धताही जवळपास 70 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने प्रसारमाध्यमांना माहिती दिली की, देशात एकाच दिवसात 6700 टन व्यावसायिक एलपीजीची विक्री झाली, जे अंदाजे 3.5 लाख सिलिंडरच्या बरोबरीचे आहे. याशिवाय, याच कालावधीत अंदाजे 1.06  लाख पाच-किलोचे सिलिंडरही विकले गेले.

होर्मुझची सामुद्रधुनी इतकी महत्त्वाची का?

इराण आणि ओमान यांच्यामधील समुद्राच्या एका लहानशा भागाला 'होर्मुझची सामुद्रधुनी' म्हटले जाते. हा केवळ 34 किलोमीटर रुंदीचा एक अरुंद जलपट्टा आहे, परंतु त्याचे महत्त्व इतके प्रचंड आहे की त्याला जगाची 'आर्थिक नाडी' मानले जाते. हा मार्ग आखाती देशांना हिंद महासागराशी जोडतो. जगातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी एक-पंचमांश पुरवठा याच मार्गातून होतो. केवळ तेलच नव्हे, तर खते आणि इतर अत्यावश्यक कृषी उत्पादनेही या सागरी मार्गाद्वारे जगभर वाहून नेली जातात.

पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडणारा हा जलमार्ग जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा

होर्मुझ सामुद्रधुनीतून आपल्या व्यापारी जहाजांची वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यात यशस्वी झालेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडणारा हा जलमार्ग जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पश्चिम आशियातील युद्धाआधी या जलमार्गातून जगभरातील अनेक देशांना नैसर्गिक वायूसह खनिज तेलाचा नियमित पुरवठा केला जात होता. सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत या जलमार्गावर व्यापारी जहाजे अडकून पडल्याने अनेक देशांवर इंधन टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. भारताला मात्र होर्मुझ सामुद्रधुनीतून आपल्या जहाजांचा मार्ग मोकळा ठेवण्यात काही प्रमाणात यश आले आहे. भारताव्यतिरिक्त चीन, रशिया, मलेशिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांनीही आपापली मालवाहू जहाजे या जलमार्गातून बाहेर

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.