IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल
esakal April 17, 2026 02:45 AM

Mumbai Indians vs Punjab Kings Cricket Updates: पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील अपराजित मालिका कायम राखली... गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रेयस अय्यरच्या संघाने यजमान मुंबई इंडियन्सचा दारूण पराभव केला. मुंबईचा हा सलग चौथा पराभव ठरला आणि ते IPL 2026 Points Table मध्ये नवव्या क्रमांकावर राहिले. PBKS ने या विजयासह ९ गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेताना RCB व RR यांना मागे ढकलेले. मुंबईच्या गचाळ क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमुळे क्विंटन डी कॉकचे वादळी शतक व्यर्थ गेले.

२ बाद १२ धावांवरून मुंबईला २०० पार जाण्याचे स्वप्न क्विंटन डी कॉक आणि नमन धीर यांनी दाखवले. अर्शदीप सिंगने दोन चेंडूंवर दोन विकेट्स घेऊन पंजाबला चांगली सुरुवात करून दिली. पण, त्यानंतर नमन व क्विंटन यांनी ६८ चेंडूंत १२२ धावा जोडल्या. नमन ३१ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५० धावांवर बाद झाला. क्विंटन ६० चेंडूंत ८ चौकार व ७ षटकारांसह ११२ धावांवर नाबाद राहिला.

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून शतक झळकावणारा क्विंटन हा तिसरा ( लोकेश राहुल व संजू सॅमसन) फलंदाज ठरला. नमनची विकेट पडल्यानंतर मुंबईच्या धावांची गती मंदावली आणि त्यांना ६ बाद १९५ धावांपर्यंतच पोहोचता आले. त्यांनी २०-२५ धावा कमीच केल्या. प्रियांक आर्य व प्रभसिमरन सिंग यांनी लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात २१ धावा चोपल्या आणि ही त्यांची पहिल्या षटकातील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यापूर्वी हैदराबादविरुद्ध मागील सामन्यात त्यांनी १८ धावा चोपल्या होत्या. पण, अल्लाह गझनफरने सलग दोन षटकांत पंजाबच्या प्रियांश आर्य ( १५) व कूपर कॉनली ( १७) यांना माघारी पाठवले.

पंजाबने ४५ धावांवर दोन फलंदाज गमावले. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर प्रभसिमरनचा झेल जसप्रीत बुमराहने टाकला. त्याचा फायदा उचलून त्याने २४ चेंडूंत अर्धशतक झळकावले. मुंबईची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण गचाळ झालेले पाहायला मिळाले. PBKS ने १० षटकांत १०० धावा फलकावर चढवल्या होत्या.पंजाब किंग्सकडून सर्वाधिक दहा ५०+ धावांचा पराक्रम प्रभसिमरनने नावावर केला. डेव्हिड मिलर ( ९) व शॉन मार्श ( ६) या विक्रमात त्याच्या मागे आहेत. कर्णधार श्रेयस अय्यरसोबत त्याने ५५ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली.

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

प्रभसिमरनने मुंबईच्या गोलंदाजांना चांगलेच चोपले आणि मुंबईने १३ व्या षटकापर्यंतच पराभव पत्करावा लागला. श्रेयसने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून वानखेडेवरील त्याचा फिफ्टीचा दुष्काळ संपवला. शार्दूल ठाकूरला सलग दोन षटकार खेचून श्रेयसने सामना पंजाबच्या ताटात आणून ठेवला. तो ३५ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६६ धावांवर झेलबाद झाला आणि प्रभसिमरनसह त्याने ६७ चेंडूंत १३९ धावांची मॅच विनिंग भागीदारी केली. पंजबाने १६.३ षटकांत १९८ धावा करून ७ विकेट्सने विजय मिळवला. प्रभसिमनर ३९ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ८० धावांवर नाबाद राहिला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.