रशिया युक्रेनमधील युद्ध शमणार की भडकणार? साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या भेंडवळची आज होणार घट मांडणी, भाकितांकडे साऱ्याचं लक्ष
डॉ. संजय महाजन April 19, 2026 09:43 AM

घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी आजही परंपरेनं बळीराजाच्या मनातील महत्त्व कमी झालेलं नाही. भेंडवळची प्राचीन घटमांडणी परंपरा विज्ञानाच्या आधुनिक युगातही जपली जात असून, याच भविष्यवाणीविषयी शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सकता पाहायला मिळते. घटमांडणीनंतर वर्तवलेली पाऊस, पीक-पाणी, राजकीय, आर्थिक भाकितं बऱ्याचदा खरी ठरली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला निव्वळ ठोकताळे म्हणत असले, तरी शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास कायम आहे. 

दुसरीकडे, भेंडवळच्या घट मांडणीला अंधश्रद्धा निर्मूलन समिती ने विरोध दर्शवला आहे. या अशा प्रकारच्या भाकिते व अंदाजानं कुठलाही शास्त्रीय आधार नसून गेल्या पाच वर्षात या अशा घटमांडणीचे कुठलेही अंदाज खरे ठरले नाहीत. त्याच त्या गोष्टी वारंवार फिरवून सांगितल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा घट मांडणीच्या अंदाजावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोळकर यांनी केलेल आहे.

Horoscope Today 19 April 2026 : आज अक्षय्य तृतीयेचा दिवस 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.