इराणकडून या कारणामुळे भारतीय जहाजावर गोळीबार, धक्कादायक कारण पुढे, मोठी खळबळ, थेट..
GH News April 19, 2026 10:11 AM

होर्मुज खाडीत तणाव पुन्हा वाढला आहे. थेट भारतीय जहाजावर इराणकडून गोळीबार करण्यात आला. भारताने या युद्धात भूमिका कायमच शांततेची ठेवली. भारताचे इराणसोबत चांगले संबंध आहेत. ज्यावेळी तणाव प्रचंड होता, त्यावेळीही भारताचे जहाज होर्मुज खाडीतून सोडली जात होती. मात्र, काल भारताला अत्यंत मोठा धक्का देत थेट भारतीय जहाजावर इराणकडून गोळीबार करण्यात आला. भारतीय जहाजाला त्यांनी थेट टार्गेट बनवले. यानंतर भारतानेही कडक भूमिका घेतली. भारतीय जहाजावर होर्मुज खाडीत गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. आता भारतीय जहाजावर इराणकडून गोळीबार नक्की का करण्यात आला? याचे अत्यंत मोठे कारण पुढे आले. भारतीय गुप्तचर सूत्रांच्या रिपोर्टनुसार, भारतीय जहाजांवर इशारा म्हणून इराणकडून गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्यासाठी मोठा धक्का म्हणावा लागणार आहे.

इराणमधील सत्तेचा समतोल बिघडल्याचे बघायला मिळत आहे. सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली. इराणमधील काही गोष्टी अस्थिर झाल्यात. इराणची सर्वात शक्तिशाली लष्करी संघटना आयआरजीसी आणि परराष्ट्र मंत्रालय दोघांमध्ये खटके उडत आहे. दोघेही एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यांच्यात मोठे मतभेद निर्माण झालीत.

आयआरजीसी प्रमुख अहमद वाहिदी आणि त्यांच्या टीमचे स्पष्ट म्हणणे आहे की, परराष्ट्र मंत्री अराघची हे पाश्चात्य देशासोबतच्या चर्चेत खूप जास्त साैम्य झाले आहेत. अणुकार्यक्रम, क्षेपणास्त्र प्रणाली आणि हिजबुल्लाह संघटनांसी संबंध निर्णयावर अराघची साैम्य भूमिका घेत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इराणमध्ये दोन गट निर्माण झालीत.

होर्मुज खाडी खुली करण्यालाही आयआरजीसीचा विरोध आहे. होर्मुज खाडी खुली केल्याने परराष्ट्र मंत्रालयाच्या भूमिकेला उघडपणे त्यांनी भारतीय जहाजावर हल्ला करून विरोध केला आणि मोठे आव्हान दिले. याच कारणामुळे होर्मुज खाडीत भारतीय जहाजावर इशारा पर गोळीबार करण्यात आला. इराणमध्ये युद्धबंदीच्या मुद्दात दोन गट तयार झाल्याचे बघायला मिळत आहे. भारतही जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर आक्रमक भूमिकेत दिसत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.