Shaktipeeth Highway: एका विशिष्ट 'देवा'ला शेतकऱ्यांची सुपीक जमीन लागते; जयंत पाटलांची फडणवीसांवर बोचरी टीका
Saam TV April 26, 2026 02:45 AM

शक्तिपीठ महामार्ग आणि त्याला होणाऱ्या विरोधामुळे सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चांगलाच चर्चेत आला आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्दावरून शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. भक्ताची जमीन कोणत्याही देवाला चालत नाही, पण राज्यातल्या एका विशिष्ट देवाला मात्र चालते' असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता लगावला. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

आंदोलनावेळी विपरित घडलं! अखिलेश यादवांचा प्रतिकात्मक जाळताना स्फोट,भाजपच्या महिला आमदार होरपळल्या

जयंत पाटील हे वाळवा तालुक्यातील शेतकरीमेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. दरम्यान शक्तिपीठ महामार्गामुळे वाळवा तालुक्यातील सुपीक बागायती जमिनींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे, यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. त्यांच्याकडे प्रकल्पाला विरोध होतोय. मागणी नसताना हा प्रकल्प शेतकऱ्यांवर लादला जात असल्याचा आरोप या मेळाव्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.

Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्ग जाणार तिथे रातोरात फुलवल्या आंब्याचा बागा, नेमकं कारण काय?

यावेळी बोलतानाजयंत पाटीलम्हणाले की, आम्हाला र्व देव पावले आहेत, पण एकच देव पावायचा राहिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जुना रस्ता पाहावा किंवा अन्य पर्याय शोधावा, पण हा विनाशकारी रस्ता रद्द करावा. मागणी नसताना हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या माथी मारला जातोय. वाळवा तालुका दरवर्षी कृष्णा आणि वारणेच्या महापुराचा सामना करतो, मात्र तो नैसर्गिक आहे.

पण शक्तिपीठ महामार्ग हे ‘मानवनिर्मित संकट’ ठरेन. शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त करून रस्ता बांधणे हे कोणत्याच देवाला मान्य नाहीये, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले. भक्ताची जमीन हिरावून घेणारा रस्ता कोणत्या देवाला हवा आहे? वाळव्याच्या शेतकऱ्याचा विरोध हा केवळ रस्त्याला नाहीये. तर आमच्या अस्तित्वावर येणाऱ्या गदेला आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एकजूट होऊन सामना करावा,असंही जयंत पाटील म्हणालेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.