पंचांग -
रविवार : वैशाख शुद्ध १०, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.११ सूर्यास्त ६.५३, चंद्रोदय दुपारी २.२८ चंद्रास्त पहाटे ३.१४, भारतीय सौर वैशाख ६ शके १९४८.
दिनविशेष -
१९९५ - आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत निशा मोहोताने ‘इंटरनॅशनल वूमन मास्टर’चा किताब मिळविला. हा किताब मिळविणारी १४ वर्षांची निशा ही सर्वांत लहान भारतीय खेळाडू ठरली.
२००० - ख्यातनाम लेखिका चित्रितादेवी यांना साहित्यसेवेचा गौरव म्हणून प्रसिद्ध विश्वभारती विद्यापीठाने ‘देशिकोत्तमा’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले.