Mangalwedha Marriage Registration: विवाह नोंदणीचे अधिकार ग्रामीण रुग्णालयाकडे, पण बारकोड सुविधा नाही...
esakal April 27, 2026 09:45 PM

मंगळवेढा : सकाळ वृत्तसेवा शहरांमध्ये नव्याने लग्न झालेल्या मुला-मुलींना त्यांच्या विवाहाची नोंद लावण्यासाठी नगरपालिके ऐवजी ग्रामीण रुग्णालयाकडे जावे लागत आहे परंतु ग्रामीण रुग्णालयात त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्र व दाखला बारकोड प्रमाणित नसल्यामुळे शहरातील नवविवाहित तरुण-तरुणींना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

ग्रामीण भागात नव्याने विवाह केलेल्यांच्या नोंदीचे अधिकार हे ग्रामसेवकाला आहेत तर शहरांमध्ये ते अधिकार नगरपालिकेच्या ऐवजी शासनाने ग्रामीण रुग्णालयाकडे दिलेले आहेत ग्रामीण रुग्णालयाकडून विवाहाची नोंद करण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रांची संख्या ही मोठी आहे ती कागदपत्रे गोळा करताना वधू-वरांच्या नातेवाईकांची चांगलीच दमछाक होत आहे. तर शासनाने अलीकडच्या काळात विविध कामासाठी आवश्यक असणारे दाखले हे बारकोड प्रमाणित दाखल्याची मागणी केली जात आहे त्यामुळे नगरपालिकेकडून जन्म मृत्यूचे दाखले हे बारकोड प्रमाणे दिले जात आहेत मात्र ग्रामीण रुग्णालयाकडून विवाह नोंदीचे दाखले हे बारकोड प्रमाणे दिले जात नाहीत त्यामुळे या दाखल्याचा उपयोग वधूवरांना अन्य शासकीय कामासाठी विशेषता आधार कार्ड वरील नावात बदल व पासपोर्ट काढण्यासाठी करता येत नसल्यामुळे एवढी पळापळ करून काढण्यात आलेल्या दाखल्याचा उपयोग होत नसल्यामुळे शहरातील नागरिक चांगलेच गोंधळलेले आहेत शिवाय शहरांमध्ये नव्याने झालेल्या विवाहाची नोंद करताना चांगली दमछाक होत आहे.

याकडे प्रशासनाने मात्र आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध देण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे मंगळवेढा शहराच्या हद्दीत विवाह नको रे म्हणण्याची वेळ येऊ लागली आहे. याकडे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाय्रानी लक्ष घालून विवाह नोंदणीची प्रक्रिया सोयीस्कर आणि बारकोड प्रमाणित दाखले देण्याच्या दृष्टीने कशी होईल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. ग्रामीण रुग्णालयाकडे सदर दाखले देण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड ही सुविधा नसल्यामुळे हे दाखले ऑफलाइन पद्धतीने जात असल्याची माहिती मिळाली त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाकडे युझर आयडी आणि पासवर्ड ची सुविधा देखील उपलब्ध करून द्यावी.

शहरातील नवविवाहित तरुणांना प्रशासकीय कामासाठी बारकोड प्रमाणेच विवाह नोंदीच्या दाखल्याची आवश्यकता असते परंतु प्रशासनाकडे युजर आयडी आणि पासवर्ड नाही म्हणून ऑफलाइन टाकले देऊन विनाकारण मनस्ताप देण्याचा प्रयत्न होत आहे तरी बारकोड प्रमाणित दाखले उपलब्ध करावेत.

प्रीती सूर्यवंशी, नगरसेविका मंगळवेढा

जन्ममृत्यूच्या दाखल्याप्रमाणे विवाह नोंदीचे अधिकारही नगरपालिकेला देवून विवाह नोंदणी, दाखले देखील पूर्वी प्रमाणे नगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यासंदर्भातील मागणी शासनाकडे करणार आहे.

सुनंदा अवताडे, नगराध्यक्ष मंगळवेढा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.