Maharashtra News Live Updates: पश्चिम बंगालचा गड 15 वर्षानंतर हातून गेल्यानं अस्वस्थ झालेल्या ममता बॅनर्जींनी काल पत्रकार परिषद घेतली. आपण हरलो नाही मग राजीनामा कसा देणार, असं म्हणत ममता बॅनर्जींनी आडमुठी भूमिका घेतली. त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत. नैतिकदृष्ट्याही मी स्वतःला विजयी मानते. त्यामुळे मी राजभवनात जाऊन राजीनामा देणार नाही अशी अजब भूमिका ममता बॅनर्जींनी घेतली. तसंच येत्या काळात इंडिया आघाडीची मजबूत मोट बांधणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यासह देश-विदेशातील ताज्या आणि महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स, एका क्लिकवर