बांगलादेशी फेरीवाल्यांवर कशी कारवाई होणार? हायकोर्टाने महापालिकेकडे मागितला तपशील
Marathi May 06, 2026 09:25 AM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बांगलादेशी फेरीवाल्यांवर कशा प्रकारे कारवाई केली जाणार याची सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी महापालिकेला दिले.

न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाथा यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. बांगलादेशी फेरीवाल्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. ही कारवाई कशी केली जाणार याचा तपशील उद्या, बुधवारी सादर करा, असेही न्यायालयाने पालिकेला सांगितले आहे. अवैध फेरीवाल्यांवर पालिका अधिकाऱयांचा आशीर्वाद आहे. परिणामी अधिकृत फेरीवाल्यांना सरकारी अधिकाऱयांप्रमाणे ओळखपत्र द्या, जेणेकरून कारवाई अधिक तीव्र पद्धतीने करता येईल, असेही न्यायालयाने पालिकेला बजावले. बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई केली जाईल. ते मुंबईत व्यवसाय करू शकत नाहीत, पण या कारवाईसाठी आम्हाला पोलीस संरक्षण लागेल, असे पालिकेने सांगितले. मात्र आतापर्यंत तुम्ही किती बांगलादेशी शोधलेत. प्रत्येकवेळी बांगलादेशी फेरीवाल्यांची माहिती नागरिक तुम्हाला देणार नाहीत, असे न्यायालयाने सुनावले.

व्हॉटस्अॅप नंबर तयार करा

– बांगलादेशी फेरीवाल्याचा फोटो नागरिक थेट अपलोड करू शकतील असा व्हॉटस्अॅप नंबर तयार करा, अशी सूचना न्यायालयाने पालिकेला केली.

बळी जाणे लाजिरवाणी गोष्ट

– कांदिवली येथे अवैध फेरीवाल्यांवर कारवाई होताना एकाचा बळी गेला. पोलिसांनी लाठीचार्ज केला. ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचे खडे बोल न्यायालयाने सुनावले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.