फाल्ता मतदारसंघातही भाजपचा दणदणीत विजय
Marathi May 25, 2026 02:25 PM

भाजपचे देबांशू पांडा 1,09,021 मतांनी विजयी : तृणमूलचा उमेदवार चौथ्या स्थानी

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या फाल्टा विधानसभा मतदारसंघात भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. हा मतदारसंघ अलिकडेच झालेल्या 2026 च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता. गेल्या आठवड्यात झालेल्या फेरमतदानानंतर रविवारी मतमोजणी करण्यात आली. अंतिम निकालाअंती भाजपचे उमेदवार देबांशू पांडा हे 1,09,021 मतांनी विजयी ठरले.

मतमोजणीमध्ये भाजपने सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. या जागेवरून निवडणूक लढवलेले तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान हे चौथ्या स्थानावर फेकले गेले. मतमोजणीच्या 22 फेऱ्यांनंतर भाजपचे उमेदवार देबांशू पांडा यांना 1,49,666 इतकी मते मिळाली. ते 1 लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले. आता ते बंगालमध्ये सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले आमदार ठरले आहेत. माकपचे शभूनाथ कुर्मी हे दुसऱ्या स्थानी राहिले असून त्यांना 40,645 (-109021) मते पडली. तर काँग्रेसचे अब्दुर रज्जाक मोल्ला 10,084 मते मिळवत तिसऱ्या स्थानी राहिले. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांना केवळ 7,783 इतकीच मते पडली.

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिह्यातील फाल्टा विधानसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले. त्यानंतर, मतदानादरम्यान काही ईव्हीएममध्ये भाजप उमेदवाराच्या समोरच्या बटणावर टेप चिकटलेला आढळून आला. यानंतर निवडणूक आयोगाने संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द ठरविली. 4 मे रोजी भाजपने 293 सदस्यीय विधानसभेत 207 जागा जिंकल्या. त्यानंतर 21 मे रोजी फाल्टामध्ये फेरमतदान झाले. परंतु प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, स्वत:ला ‘पुष्पा’ म्हणून सादर करणारे टीएमसी उमेदवार जहांगीर खान यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

 

कोणाला किती मते ?

देबांशू पांडा, भाजपा: १,४९,६६६ (+१,०९,०२१)

शभुनाथ कुर्मी, CCP: 40,645 (-1,09,021)

अब्दुर मोल्ला, काँग्रेस: ​​१०,०८४ (-१,३९,५८२)

जहांगीर खान, TMC: 7,783 (-1,41,883)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.