Injury Concern Could Open The Door For A Surprise Selection: भारतीय संघ ६ जूनपासून मुल्लनपूर येथे भारत आणि अफगाणिस्तान( IND vs AFG) यांच्यात कसोटी(Test Cricket) सामना खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ १३ जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.
या सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे. मात्र आता भारताच्या वनडे संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली या सामन्यांसाठी खेळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार विराट कोहली अद्याप हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या मालिकेसाठी त्याची जागा घेण्यासाठी ऋतुराज गायकवाड हा प्रमुख दावेदार म्हणून समोर आला आहे.
IND vs AFG Test: IPL संपलं, आता टीम इंडिया लागली कसोटीच्या सरावाला; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहाणार सामना?माहितीनुसार आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे कोहली या मालिकेसाठी खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. ही दुखापत नवीन असल्याचे सांगितले जात असून त्यातून पूर्णपणे बरे होण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला काही आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
या मालिकेसाठी कोहलीच्या उपस्थितीबाबत अनिश्चितता असल्याचे इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्तात म्हटले आहे. निवड समिती मधल्या फळीत त्याच्या जागी ऋतुराज गायकवाडचा समावेश करण्याचा विचार करत आहे.
हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झालेल्या रियान परागच्या जागी या महाराष्ट्राच्या फलंदाजाला नुकतेच इंडिया 'अ' संघात स्थान मिळाले आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार असलेल्या गायकवाडचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीच्या भारताच्या एकदिवसीय संघातही समावेश होता. त्या दौऱ्यात त्याने मधल्या फळीत फलंदाजी करताना शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे वरिष्ठ संघात पुनरागमन करण्याचा त्याचा दावा आणखी मजबूत झाला आहे.
ऋतुराजला वरिष्ठ संघात बढती मिळाल्यास श्रीलंका दौऱ्यासाठी भारत 'अ' संघात एक जागा रिकामी होऊ शकते. त्याच वृत्तानुसार गायकवाडच्या जागी रजत पाटीदारच्या नावाचा विचार केला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली २०२५ मध्ये पहिले विजेतेपद मिळाले आणि २०२६ मध्ये संघाने सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले. त्याच्या नेतृत्वाखाली बंगळुरू संघाने दोन वेळा ट्रॉफी जिंकून आयपीएलमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे.
Vaibhav Sooryavanshi चा भारतीय संघात युरोप दौऱ्यावेळी समावेश होणार? BCCI सचिवांकडून मोठे संकेतत्याचबरोबर आयपीएल २०२६ मध्ये आपल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर रजत पाटीदारने या मालिकेसाठीही आपली दावेदारी मजबूत केली आहे. भारत 'अ', श्रीलंका 'अ' आणि अफगाणिस्तान 'अ' यांचा समावेश असलेला हा त्रिकोणी दौरा ९ जून रोजी सुरू होणार आहे.