-डी.के. वळसे पाटील
मंचर : हवामान विभागाने सोमवारी (ता. ६) पुणे जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केल्याने संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जितेंद्र डुडी यांनी दिली.
जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, नदी-नाले, ओढे आणि इतर धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.तसेच, स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना व इशाऱ्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.