पाली: सुधागड तालुक्यातील पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर या 6 किलोमीटर रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 'नऊ गाव संघर्ष समिती' आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने रविवारी (ता.5) एक अत्यंत आगळीवेगळी आणि उपहासात्मक पिकनिक साजरी करण्यात आली. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या 'चंद्रावरील पिकनिकला चला' या आवाहनाला प्रतिसाद देत, परिसरातील शेकडो नागरिक, महिला व तरुण भर पावसात या अनोख्या सहलीमध्ये सहभागी झाले होते.
Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..सकाळपासूनच पाच्छापूर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र, पावसाची पर्वा न करता महिला आणि तरुण वर्ग हातात विविध संदेश लिहिलेले फलक घेऊन रस्त्यावर उतरले होते. या फलकांच्या माध्यमातून प्रशासकीय अनास्थेवर अतिशय मार्मिक आणि खोचक टिप्पणी करण्यात आली होती. रस्त्यावरील विवरासारख्या मोठ्या खड्ड्यांकडे केवळ तक्रार म्हणून न पाहता, ग्रामस्थांनी या खड्ड्यांचा वापर पर्यटनाचे केंद्र म्हणून केला.
या सहलीदरम्यान ग्रामस्थांनी रस्त्यावरील विस्तीर्ण खड्ड्याला फुलांनी सुंदर सजवले आणि त्याची रीतसर पूजा करून आरती केली. खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात लहान मुलांनी कागदी होड्या सोडल्या, तर तरुण थेट चिखलमय पाण्यात बसले. त्यांनी एकमेकांवर पाणी उडवून 'वॉटर स्पोर्ट्स'चा मनमुराद आनंद लुटला. काही दिवसांपूर्वीच याच मार्गावर ४२ प्रवाशांनी भरलेली एसटी बस खराब रस्त्यामुळे पलटी होता-होता वाचली होती, त्यामुळे या उपहासात्मक सहलीद्वारे ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना अनोख्या पद्धतीने व्यक्त केल्या.
Nagpur Pune Vande Bharat: प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर–पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणार नवीन १६/२० डब्यांचा रेक; विदर्भ–पश्चिम महाराष्ट्र प्रवास होणार सोयीचाप्रशासनाला कोणतीही दूषणे न देता किंवा नेहमीच्या मार्गाने घोषणाबाजी न करता, केवळ एका सहलीच्या आणि फलकांच्या माध्यमातून नऊ गावांतील जनतेने दाखवलेली ही एकजूट संपूर्ण रायगड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. या अनोख्या उपक्रमाची दखल घेऊन आतातरी स्थानिक प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग पाच्छापूर रस्त्याचे काम हाती घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.