Pune News: कात्रज तलावाच्या कठड्यावरून खाली पडला, ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना
Saam TV July 06, 2026 02:45 AM
  • कात्रज तलावाजवळ कठड्यावरून पडून व्यक्तीचा मृत्यू

  • पुणे कात्रज तलाव परिसरात एकच खळबळ

  • या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील कात्रज तलाव परिसरात कठड्यावरून पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. कात्रज तलावालगत असलेल्या कठड्यावर ही व्यक्ती बसली होती. त्यावेळी ही व्यक्ती अचानक खाली कोसळली. या घटनेत ४५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या घटनेनंतर कात्रज तलाव परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज दुपारी पुण्यातील कात्रज भागात घडली. कात्रजमध्ये असलेल्या तलाव परिसरातील सुरक्षा रक्षकाला तलावाच्या शेजारील मोकळ्या जागेत एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळून आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याने पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

Pune Accident Black Spot: पुणे शहरासह जिल्ह्यात अपघात वाढले! जीवघेणे ६३ ब्लॅक स्पॉट; 'या' रस्त्यांवर होतात सर्वाधिक अपघात

संबंधित व्यक्ती खोल दरीत पडल्याने तातडीने अग्निशामक दलआणि रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून व्यक्तीला वर काढले. डॉक्टरांनी तपासणी केली असता संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय कार्यवाहीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या व्यक्तीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे नेमकं कारण समोर येईल. पण या घटनेमुळे काहीकाळ परिसरात खळबळ उडाली होती.

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 2 महिन्यातच खड्डे; व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.