तुमचे वडील केव्हाही… डॉक्टरांच्या त्या विधानाने सलमान, सोहेल होते हादरले, सलीम खान कोमात असताना काय घडलं?
Tv9 Marathi July 06, 2026 02:45 AM

सुपरस्टार सलमान खान यांचे वडील सलीम खान हे 90 वर्षाचे आहेत. खान कुटुंबासाठी सलीम खान म्हणजे जीव की प्राण आहे. या कुटुंबाचं एकमेकांशी अत्यंत चांगलं बाँडिंग आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सलीम खान यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्य टेन्शनमध्ये होता. सलीम खान यांना ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यामुळे त्यांना बराच काळ रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. सलीम खान यांना बरं वाटावं म्हणून बॉलिवूडच नव्हे तर सलमानच्या फॅन्सनेही दुआ केली होती.

सलीम खान रुग्णालयातून घरी आल्यानंतर ईदच्या दिवेशी सर्वांना दिसले होते. सलमान खानने इन्स्टाग्रामवर आपल्या वडिलांचा व्हिडिओ शेअर केला होता. वडिलांची प्रकृती ठणठणीत असल्याचं त्याने सांगितलं होतं. पण सलीम खान जेव्हा रुग्णालयात होते, तेव्हा त्यांच्या प्रकृतीच्या बातम्या बाहेर येणार नाही याची सलमानने काळजी घेतली होती. त्यामुळे सलीम खान यांना नेमकं काय झालं? हेच कळायला मार्ग नव्हता. पण सोहेल खानने आपल्या पित्याच्या तब्येतीवर कुणताच खुलासा केला आहे. वडील आजारी होती. तो संपूर्ण महिना आम्ही सर्वच तणावात होतो, असं सोहेल खानने म्टलं आहे.

मला मुलं आहेत, त्यांच्याकडे वेळ आहे…

कुणाल खेमूच्या द अलायन्स या शोमध्ये सोहेल खान वाइल्ड कार्डद्वारे आला होता. यावेळी सोहेलने त्याची टीम वॉरियर्सशी गप्पा मारल्या. यावेळी त्याने सलीम खान यांच्या प्रकृतीची संपूर्ण कहाणीच सांगितली. मी माझा अधिकाधिक वेळ आईवडिलांसोबत घालवत असतो. वेळ हीच एकमेव अनमोल गोष्ट आहे, जी तुम्ही इतरांना देऊ शकता. मला मुलं आहेत. ती खूप लहान आहेत. त्यांच्याकडे बराच वेळ आहे, असं सोहेलने सांगितलं.

डॉक्टर म्हणाले, अन्…

पण माझे आईवडील वयोवृद्ध आहेत. त्यामुळे माझा जास्तीत जास्त वेळ मी माझ्या आईवडिलांसोबत घालवत असतो. काही आठवड्यांपूर्वी माझे वडील आजारी होते. तेव्हा ते अर्धे कोमात गेले होते. मी त्यांच्यासोबत रुग्णालयातच होतो. माझं काळीजच खिन्न झालं. आम्ही आमच्या वडिलांचं छत्र हरवू शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. माझ्यासाठी माझे आईवडील सर्वात प्रिय आहेत. माझ्या वडिलांना काही झालं तर मी स्वत:ला कसं सावरू शकेल याची कल्पनाच मी करवत नव्हतो. माझ्यासाठी माझे आईवडीलच माझी जिंदगी आहेत. ते माझ्यासाठी सर्व काही आहेत, असंही त्याने सांगितलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.