Brazil vs Norway : नेयमार रडला, पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी! सामन्यानंतर नॉर्वे अन् Erling Haaland ची जखमेवर मीठ चोळणारी कृती Video Viral
esakal July 06, 2026 09:45 AM

Norway's Erling Haaland viral celebration after Brazil win: नॉर्वे संघाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत सोमवारी इतिहास रचला... पाचवेळच्या विजेत्या ब्राझील संघाला त्यांनी २-१ असा फरकाने पराभूत करून स्पर्धेबाहेर फेकले. एर्लिंग हालंडच्या दोन गोलने नॉर्वेला पहिल्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवले. या सामन्यानंतर ब्राझीलचा स्टार खेळाडू नेयमार ज्यूनियर ( Neymar) ढसाढसा रडला, परंतु सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून त्याने महान खेळाडू पेले ( Pele) यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. नॉर्वेने हा सामना जिंकल्यानंतर त्यांचे खास पारंपरिक सेलिब्रेशन करून पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधले.

Brazilvs Norway सामन्यात पहिल्या १० मिनिटांत दोन गोल पाहायला मिळाले असते, परंतु तिसऱ्या मिनिटाला नॉर्वेचा गोल ऑफ साईड म्हणून नाकारला गेला. तेच ब्राझीलने पेनल्टीवर गोल करण्याची संधी गमावली, नॉर्वेचा गोलरक्षक ओर्जन नायलांडने भन्नाट बचाव केला. सामन्याचा पहिला गोल ७९व्या मिनिटाला हालंडच्या हेडरने आला आणि त्यात ९०व्या मिनिटाला दुसऱ्या गोलची भर पडली. ब्राझीलसाठी ९०+१० मिनिटाला नेयमारने पेलन्टीवर गोल केला. या गोलसह त्याने एका विक्रमाला गवसणी घातली.

Erling Haaland चा विक्रम! लिओनेल मेस्सी, किलियन एम्बाप्पेला भिडला अन् World Cup इतिहासात असे प्रथमच घडले, ५६ वर्षांत...

नेयमारने चार वेगवेगळ्या वर्ल्ड कप स्पर्धेत गोल केले आहेत आणि त्याने यासह पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्यांनीही चार वेगवेगळ्या वर्ल्ड कप स्पर्धेत गोल केले होते. या विक्रमात पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो ( ६) व अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी ( ५) पुढे आहेत. १९९० नंतर प्रथमच ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयश आले आणि या निकालानंतर नेयमारसह संपूर्ण संघ ढसाढसा रडताना दिसला.

तेच दुसरीकडे हालंडच्या शानदार दोन गोलने देशाच्या फुटबॉल इतिहासातील सर्वोत्तम विजय निश्चित केला. नॉर्वेच्या गोलरक्षक ओर्जन नायलांडनेही उत्कृष्ट कामगिरी केली. अंतिम आठ संघांमध्ये त्यांचा सामना मेक्सिको किंवा इंग्लंडशी होईल. हालंडने आता नॉर्वेसाठी ५४ सामन्यांमध्ये ६२ वेळा गोल केले आहेत. त्याने त्याचा बालपणीचा आदर्श असलेल्या झ्लाटन इब्राहिमोविचच्या ६२ गोल्सची बरोबरी केली आहे. या विजयानंतर हालंडने ड्रम बाजवून पारंपरिक पद्धतीने सेलिब्रेशन केले आणि तो व्हिडीओ सध्या सोशल मीडिया गाजवतोय.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.