अलिबागनंतर थेट लंडनला गाठलं अन् आता पुन्हा मुंबईत; अनुष्का-विराटची रिअल इस्टेट मोठी गुंतवणूक
Marathi July 28, 2026 11:25 AM

विराट कोहली अनुष्का शर्माने मुंबईत लक्झरी अपार्टमेंट खरेदी केले. टीम इंडियाचा (Team India) स्टार क्रिकेटपटू (Cricketer) विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी मुंबईतील (Mumbai News) प्रीमियम रिअल इस्टेट मार्केटमध्ये (Premium Real Estate Market) एक मोठी गुंतवणूक केली आहे. या जोडप्यानं मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा भागात असलेल्या ‘गोदरेज स्कायशोर’ (Godrej Skyshore) प्रकल्पात 18.29 कोटी रुपये किमतीचा एक आलिशान फ्लॅट (Luxurious Flat) खरेदी केला आहे. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांनुसार, हा फ्लॅट एका हाय-एंड रेजिडेंशियल प्रोजेक्टचा भाग असून, तो मुंबईतील आलिशान घरांच्या हाउसिंग मार्केटमधील सातत्यानं वाढणारी मागणीही दर्शवतो.

‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया 2,644 चौरस फूट आहे. याव्यतिरिक्त, या फ्लॅटसोबत 316 चौरस फुटांचा एक्सक्लूसिव एरिया आणि तीन गाड्यांच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. कागदपत्रांवरून असं दिसून येतंय की, हा व्यवहार साधारणपणे 69,159 रुपये प्रति चौरस फूट या दरानं पूर्ण झालाय. वर्सोवाच्या प्रीमियम रिअल इस्टेट बाजारपेठेत मागणीत मोठी वाढ झाली आहे.

विरुष्कानं रजिस्ट्रेशन कधी केलं? (Virat Kohli Anushka Sharma Luxury Apartment Registration)

प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनच्या रेकॉर्डनुसार, या सौद्याचं रजिस्ट्रेशन 21 जुलै 2026 रोजी केलंय. या खरेदीवर विरुष्कानं जवळपास 1.09 कोटींची स्टँप ड्युटी आणि 30 हजार रुपयांचं रजिस्ट्रेशन भरावं लागलं. कागदपत्रांमधून हेसुद्धा समजतंय की, ही खरेदी थेट गोदरेज प्रॉपर्टीजच्या प्रकल्पात करण्यात आली आहे.

अनुष्का-विराटकडून वर्सोवाची निवड का, काय आहे खास? (Virat Kohli Anushka Sharma Buys Apartment In Versova)

अनुष्का विराटनं अलिबागमध्ये आपलं आलिशान फार्महाऊस बांधल्यानंतर त्यांनी पुढे लंडनमध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतलेला, पण आता त्यांनी पुन्हा मुंबईत केलेल्या गुंतवणुकीमुळे दोघेही आता इथेच राहणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, दोघांनी रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी वर्सोवाची निवड का केली? अशीही चर्चा सुरू आहे. वर्सोवामध्ये असं काय आहे खास? अशा चर्चाही सुरू आहेत.

वर्सोवाची गणना मुंबईतील अत्यंत पसंतीच्या आणि आलिशान निवासी क्षेत्रांमध्ये केली जाते. चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती इथे वास्तव्यास आहेत. उत्तम कनेक्टिव्हिटी, मेट्रोचं जाळं, समुद्रकिनाऱ्यावर असलेलं सान्निध्य आणि उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांमुळे या भागातील आलिशान घरांची मागणी सातत्यानं वाढतेय. बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्यांसाठी इथून गोरेगावमधील ‘फिल्म सिटी’पर्यंतचा प्रवास सोयीस्कर आहे. याशिवाय, जवळच असलेल्या अंधेरी भागात अनेक स्टुडिओंचं केंद्रीकरण आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

John Abraham Buys Bungalow: जॉन अब्राहमकडून चाहत्यांसाठी गुड न्यूज, मुंबईतील पॉश परिसरात खरेदी केला बंगला, किंमत ऐकून थक्क व्हाल

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.