प्राणीमित्रांच्या तक्रारीनंतर पोलीस मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरु व्यक्तीच्या घरी गेले होते. त्यावेळी या व्यक्तीचा मुलगा पोलिसांना सामोरा केला. त्याने पोलिसांनी आपले वडील आतल्या खोलीत असल्याचे सांगितले. माझ्या वडिलांचं वय 60 पेक्षा जास्त आहे, ते आताच रिटायर्ड झालेत, असे त्याने सांगितले. यावेळी मुलाने आपल्या वडिलांना मानसिक आजार असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांसोबत उपस्थित असलेल्या नागरिकांना हे म्हणणे पटले नाही. त्याने शांत डोक्याने मांजरीला खाली ढकलल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आम्ही व्हिडीओ बघितल्यानंतर हादरुन गेलो. ती मांजर खूप साधी होती, कोणाला त्रास द्यायची नाही. ती इमारतीच्या सगळ्या मजल्यांवर फिरायची, लिफ्टचा वापरही करायची, असे सोसायटीमधील नागरिकांनी सांगितले.
View this post on Instagram
या इमारतीमधील एका तरुणाने सांगितले की, मी झोमॅटो डिलिव्हरीसाठी जाऊन परत यायचो तेव्हा मांजर माझ्यासोबत यायची. तिला मी खायला द्यायचो. 26 जुलैला ती इमारतीच्या खाली नेहमीप्रमाणे मला दिसली. त्यानंतर काहीवेळात हा प्रकार घडल्याचे तरुणाने सांगितले. ज्या प्राणीमित्रांनी पोलिसांत तक्रार दिली, त्यांनी ही मांजर गर्भवती असल्याचे सांगितले. माथेफिरुने तिला 12 व्या मजल्यावरुन ढकलल्यानंतर ती खाली एका पत्र्यावर आपटली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.