'प्रवीण तरडेने मला सणसणीत कानफाडात मारलीय ' कुशल बद्रिकेनं सांगितला शूटिंगमधील किस्सा, म्हणाला..
abp majha web team July 28, 2026 05:43 PM

Kushal Badrike on Pravin Tarde: आपल्या टाइमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा विनोदी अभिनेता कुशल बद्रिके सध्या चर्चेत आहे. 'मामाच्या गोव्याला जाऊया' या फिल्ममुळे.  या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता कुशल बद्रिके सध्या विविध माध्यमांना मुलाखती देताना दिसतोय. या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. विशेष म्हणजे या ट्रेलरमधील एका सीनची प्रचंड चर्चा आहे. यासीन मध्ये प्रवीण तरडे कुशल बद्रिकेच्या कानशिलात लगावताना दिसतोय. आणि विशेष म्हणजे हा सीन खरंच करण्यात आलाय.  अलीकडेच इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत कुशल बद्रिकेने या सीनचा एक किस्सा सांगितलाय.

'प्रवीण तरडेने मला सणसणीत कानफाडात मारलीय..'

कुशल बद्रिके म्हणाला 'प्रवीण तरडेन एखादी टिचकी जरी मारली तरी उडून जाणारा माझा देह. त्याने मला सणसणीत कानफाटात मारलीये. आणि हे विजू माने यांच्यामुळे झालं. प्रवीण आधी खूप सावरून सावरून कांशिलात मारण्याचा सिम शूट करत होता.पण विजू माने म्हणाले की हे खरं वाटत नाही. हे खरं वाटायचं नादात प्रवीण मला खरंच वाजवली.सीन शूट करताना मला प्रवीण म्हणालेला 'तू काळजी करू नकोस, माझा हात बाजूने जाईल ' पण तो बाजूने नाही, भाजून गेला. ' असं कुशल बद्रिके म्हणाला.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

मामाच्या गोव्याला जाऊया या सिनेमात कुशल बद्रिके सोबत अंकुश चौधरी अभिजीत चव्हाण संतोष जुवेकर या अभिनेत्यांची ओजी गॅंग प्रेक्षकांसमोर येणार आहे. सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक विजू माने म्हणाले 'स्ट्रगलर साला' चित्रपटातील संख्या बाबा आणि कुशावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं.यावेळी त्यांच्या आयुष्यात मामा येतो आणि त्या चौघांचा प्रवास पूर्णपणे बदलून जातो.हा प्रवास एवढा मजेशीर आहे आणि तितकाच अनपेक्षितही आहे.प्रत्येक पात्राची स्वतःची एक वेगळी मजा आहे.प्रत्येक प्रसंग प्रेक्षकांना हसवतानाच पुढे काय होणार याची उत्सुकता ही कायम ठेवतो.' असे ते म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.