4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क July 30, 2026 09:13 AM

Ramayana Trailer Released: 'रामायण'वर (Ramayana Movie) आधारित अनेकदा टेलिव्हिजन मालिका (TV Serials) किंवा सिनेमे (Movies) बनवले गेले आहेत. तरीही, प्रचंड बजेट किंवा व्हीएफएक्सचा (VFX) वापर न करता तयार केलेली दूरदर्शनची आवृत्ती आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. प्रभासच्या (Prabhas) 'आदिपुरुष' सिनेमाद्वारे (Adipurush Movie) या महाकाव्याचं नव्यानं सादरीकरण करण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. आता, नितेश तिवारी (Nitesh Tiwari) 4,000 कोटींच्या प्रचंड मोठ्या बजेटसह 'रामायण' घेऊन येत आहेत. हा सिनेमा दोन भागांत प्रदर्शित होणार असून पहिला भाग 2026 मध्ये आणि दुसरा भाग 2027 मध्ये येईल. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, निर्मात्यांनी आता 'रामायण'चा ट्रेलर (Ramayana Trailer) प्रदर्शित केला आहे. यात प्रभू श्रीरामाची भूमिका अद्याप पूर्णपणे समोर आली नसली तरी, रावणाच्या भूमिकेत यशनं नक्कीच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

ब्रम्हमुहूर्तावर 'रामायण'चा ट्रेलर प्रदर्शित (Ramayan Trailer Released At Brahma Muhurta)

'रामायण'च्या ट्रेलरमध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी, रवी दुबे, कुणाल कपूर, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंह, विवेक ओबेरॉय, अरुण गोविल, अजिंक्य देव आणि शोभना यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. संपूर्ण ट्रेलरमध्ये व्हीएफएक्सचा (VFX) मोठ्या प्रमाणावर वापर दिसून येतोय, ज्यामुळे सिनेमातल्या सीन्सना एक वेगळीच भव्यता प्राप्त झाली आहे. प्रत्येक पात्राचा वैशिष्ट्यपूर्ण लूक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय.

रामावर भारी पडतोय रावण (Yash Starer Ravana Overshadows Ranbir Kapoors Ram)

'रामायणम्'ची पहिली झलक पाहिल्यावर राम म्हणजेच, रणबीर कपूर दिसला. तर सीता मातेच्या भूमिकेत साई पल्लवी आणि लक्ष्मणाच्या भूमिकेत रवि दुबेची छोटीशी झलक पाहायला मिळालेली. तर, टीझरमधून रावण म्हणजेच, यश गायब होता. पण, आता ट्रेलरमध्ये यशचा रावण अवतार पाहायला मिळालाय. यशनं साकारलेला रावण फक्त रणबीरनं साकारलेल्या प्रभू श्रीरामाच्या भूमिकेवरच नाहीतर, साई पल्लवीनं साकारलेल्या सीता मातेवर आणि रवी दुबेनं साकारलेल्या लक्ष्मणावरही भारी पडलाय.  

अरुण गोविल यांनी साकारलाय राजा दशरथ (Arun Govil As King Dasaratha In Ramayana Movie)
 
आतापर्यंत 90च्या दशकातील प्रेक्षकांमध्ये अरुण गोविल यांची प्रतिमा प्रभू श्रीराम म्हणून होती. पण, रणबीर कपूर स्टारर 'रामायण'मध्ये अरुण गोविल राजा दशरथाच्या भूमिकेत झळकणार आहेत. दरम्यान, चाहत्यांमध्ये आजही ते प्रभू श्रीरामाच्या भूमिकेसाठी पहिली पसंती आहे. अरुण गोविल दशरथ अवतारात दिसले, पण त्यांची जुनी ओळख त्यांनी साकारलेल्या राजा दशरथवर प्रभाव पाडतेच. 

रावणाच्या भूमिकेवर यश काय म्हणालेला? (South Star Yash On Ramayana Movie)

दिल्लीतील ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात बोलताना यश म्हणालेला की, या भव्य पौराणिक प्रकल्पानं (रामायण) त्यांना केवळ एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधीच दिली नाही, तर हिंदी भाषा शिकण्यासही मदत केली. निर्माते नमित मल्होत्रा ​​यांचे आभार मानताना, या प्रोजेक्टमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचं श्रेय मान्य केलं आणि या प्रोजेक्टचं वर्णन व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही दृष्टीकोनातून एक अविस्मरणीय प्रवास असं केलं.

यश पुढे बोलताना म्हणाला की, "या अद्भुत प्रकल्पाचा भाग होताना, मला खरोखरंच आनंद होतोय. इथे सगळेजण हिंदीत बोलत आहेत आणि मीही तसाच प्रयत्न करेन. मला या टप्प्यापर्यंत आणण्याचं सर्व श्रेय नमित मल्होत्रा ​​यांना जातं, ही भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या निमित्तानं मला हिंदी शिकण्याचीही संधी मिळाली..." यश यांनी 'रामायण'मधील त्यांच्या सहकलाकारांच्या अभिनयाचंही कौतुक केलंय. रणबीर कपूरचं कौतुक करताना ते म्हणाले की, "रणबीर, तू खूप छान काम केलंयस. तू या भूमिकेसाठी स्वतःला किती समर्पित केलंयस आणि तू जी जादू निर्माण केली आहेस, याची जाणीव संपूर्ण देशाला होईल..."

पाहा 'रामायण' सिनेमाचा ट्रेलर : 

Ramayana Trailer Gets U Certificate: 4000 कोटींच्या 'रामायण'बाबत मेकर्सचा मोठा निर्णय; दोन ट्रेलर रिलीज होणार, सेंसर बोर्डाकडून मिळालं U सर्टिफिकेट

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.