IND vs NZ: इंडिया-न्यूझीलंड टेस्ट सीरिजआधी खेळाडूकडून कर्णधारपदाचा राजीनामा
GH News October 02, 2024 10:11 PM

टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात मायदेशात बांगलादेशवर 2-0 अशा फरकाने कसोटी मालिका जिंकली. त्यानंतर आता टीम इंडिया पुढील कसोटी मालिका ही न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. उभयसंघातील या मालिकेला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊथी याने मोठा निर्णय घेतला आहे. साऊथीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. न्यूझीलंडला साऊथीच्या नेतृत्वात श्रीलंका दौऱ्यात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. श्रीलंकेने न्यूझीलंडचा 2-0 ने व्हाईटवॉश दिला. साऊथीने या पराभवाची जबाबदारी स्वीकारत कर्णधारपदाचा राजीनामा दिला. तर साऊथीनंतर आता पुन्हा एकदा टॉम लॅथम याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

टॉम लॅथमकडे कर्णधारपदाची धुरा

टॉम लॅथम याने याआधी 2020 ते 2022 दरम्यान न्यूझीलंडचं नेतृत्व केलं होतं. लॅथमने या कालावधीत एकूण 9 सामन्यात कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली होती. आता साऊथीच्या राजीनाम्यामुळे टॉम लॅथमला ही जबाबदारी मिळाली आहे. टॉमने कर्णधारपद मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. “न्यूझीलंडचं नेतृत्व करणं ही माझ्यासाठी सन्मानाची आणि गर्वाची बाब आहे”, असं टॉम लॅथमने म्हटलं.

टीम साऊथी कर्णधारपदावरुन पायउतार, न्यूझीलंडला झटका

टीम साऊथीची कर्णधार म्हणून कामगिरी

केन विलियमसन याने 2022 साली कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर टीम साऊथीला ही जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हापासून टीमच्या नेतृत्वात न्यूझीलंडने 14 सामने खेळले आहेत. टीमच्या नेतृत्वात न्यूझीलंडने 6 सामने जिंकले तर तेवढेच गमावले. तर 2 सामने बरोबरीत राहिले. तसेच टीमला नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्याच्या कामगिरीवरही प्रभाव पाहायला मिळाला. टीमने त्याच्या नेतृत्वातील 14 सामन्यांमध्ये 38.60 च्या सरासरीने 35 विकेट्स घेतल्या.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.