Irani Trophy : सर्फराजचं नाबाद द्विशतक, मुंबईच्या दुसऱ्या दिवसअखेर रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध 536 धावा
GH News October 02, 2024 10:11 PM

इराणी ट्रॉफीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ मुंबईच्या नावावर राहिला आहे. मुंबईने रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध खेळ संपेपर्यंत 138 षटकांमध्ये 9 बाद 536 धावा केल्या आहेत. मुंबईकडून सर्फराज खान आणि एम जुनेद खान ही जोडी नाबाद परतली. एम खाने शून्यावर नाबाद परतला. तर सरफराज खान याने मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या. सरफराज 221 धावांवर नाबाद आहे. सरफराजने या खेळीत 25 चौकार आणि 4 षटकार खेचले. तर रेस्ट ऑफ इंडियाकडून मुकेश कुमार याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर यश दयाल आणि प्रसिध कृष्णा या दोघांच्या खात्यात 2-2 विकेट्स गेल्या. तर सारांश जैनने 1 विकेट घेतली.

मुंबईकडून सरफराज व्यतिरिक्त कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि तनुष कोटीयन या दोघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. कॅप्टन अजिंक्य रहाणेचं शतक अवघ्या 97 धावांनी हुकलं. रहाणेने 234 चेंडूत 97 धावा केल्या. तर तनुषने 124 बॉलमध्ये 64 रन्स केल्या. श्रेयस अय्यरने 57 धावांचं योगदान दिलं. तर शार्दूल ठाकुरने 36 धावांचं योगदान दिलं. डेब्यूटंट आयुष म्हात्रेने 19 रन्स केल्या. पृथ्वी शॉ याने निराशा केली. पृथ्वीने 4 धावा केल्या. हार्दिक तामोरे आणि मोहित अवस्थी या दोघांना भोपळाही फोडता आला नाही.

आता तिसऱ्या दिवशी सर्फराज खान आणि जुनैद खान ही जोडी शेवटच्या विकेटसाठी आणखी किती धावा जोडण्यात यशस्वी ठरते? याकडे क्रिकेट चाहत्यांच लक्ष असणार आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला

मुंबई प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सर्फराज खान, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी आणि एम जुनेद खान.

रेस्ट ऑफ इंडिया प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, इशान किशन, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, सरांश जैन, यश दयाल, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.