विश्वास बसणार नाही ! हे प्रसिद्ध कलाकार आहेत मधुमेहाचे शिकार; यादीत सोनम कपूर ते समंथाचा समावेश… – Tezzbuzz
Marathi November 15, 2024 10:24 AM

आज जागतिक मधुमेह दिन आहे. मधुमेहाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. जेव्हा आपला स्वादुपिंड योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार करू शकत नाही तेव्हा मधुमेह होतो. या आजाराचा रुग्णाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांना दररोज अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. या निमित्ताने जाणून घेऊया की कोणते बॉलीवूड सेलेब्स या जीवघेण्या आजाराच्या विळख्यात आहेत आणि ते या आजारावर कसे मात करत आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर जेव्हा केवळ 17 वर्षांची होती, तेव्हा तिला टाईप-1 मधुमेह असल्याचे समोर आले. आपल्या व्यस्त कारकिर्दीत या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी, अभिनेत्री निरोगी आहार घेते आणि नियमित व्यायाम आणि पोहणे यासारख्या शारीरिक हालचाली देखील करते.

2013 मध्ये, सिटाडेल हनी बनी अभिनेत्री समंथा रुथने खुलासा केला की ती मधुमेहाशी लढत आहे. अभिनेत्री निरोगी आहार, व्यायाम आणि तिच्या लक्षणांवर लक्ष ठेवून या आजारावर नियंत्रण ठेवते.

साऊथचा सुपरस्टार कमल हसन यांनाही टाइप-१ मधुमेह आहे. जिम वर्कआउट्स, अल्कोहोल टाळणे आणि योगासने करून अभिनेता आपला मधुमेह नियंत्रित करतो.

टेलिव्हिजन व्यक्तिमत्व गौरव कपूर यांना वयाच्या २२ व्या वर्षी मधुमेह झाल्याचे निदान झाले. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनशैलीत बरेच बदल केले. शूटिंगच्या वेळी तो फक्त घरी बनवलेले अन्न खातो आणि नियमित व्यायाम करतो.

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान वयाच्या १७ व्या वर्षापासून टाइप 1 मधुमेहाने त्रस्त आहे. अहवालानुसार, त्याचा आजार ऑटोइम्यून डिसऑर्डरमुळे झाला होता. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी अभिनेत्याने केवळ जीवनशैलीच बदलली नाही तर इन्सुलिनही घ्यावे लागते.

हॉलिवूड गायक आणि अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनास केवळ 13 वर्षांचा होता तेव्हा त्याला टाइप 1 मधुमेहाचे निदान झाले. निरोगी आहार आणि नियमित ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टमसह निक त्याचा टाइप 1 मधुमेह नियंत्रणात ठेवतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

रणवीर दीपिकाला ज्योतिषाने दिला होता लग्न न करण्याचा सल्ला; आज एकत्र पूर्ण केली आहेत ६ वर्षे…

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.