मोठी बातमी! सलग 3 दिवस शेअर बाजार राहणार बंद, लाँग विकएंडचं नेमकं कारण काय?
Marathi November 15, 2024 10:24 AM

बँक-स्टॉक मार्केट सुट्टी: सध्या शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. जागतिक परिस्थिती आणि भातातील स्थिती समजून घेऊनच शेअर बाजारात गुंतवणूक करावी, असा सल्ला दिला जातोय. दरम्यान, या आठवड्यात शेअर बाजार फक्त पाच दिवस चालू राहणार आहे. म्हणजेच 15 नोव्हेंबरपासून शेअर बजाराला सलग तीन दिवस सुट्ट्या राहणार आहेत. या सुट्ट्या नेमक्या कशामुळे आहेत?  या काळात शेअर बाजार बंद का असेल? हे जाणून घेऊ या…

15 नोव्हेंबर रोजी देशभरातील बँका तसेच शेअर बाजार बंद असणार आहे. म्हणजेच आता बँका आणि शेअर बाजाराला सलग तीन दिवस सुट्ट्या असणार आहेत. गुरु नानक जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर रोजी ही सुट्टी असेल.

कोणकोणत्या शहरात, राज्यांत बँका बंद असतील?

महाराष्ट्र, मिझोरम, मध्य प्रदेश, ओडिसा, उत्तर प्रदेश, चंदिगड, नागालँड, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, हैदराबाद, जम्मू, तेलंगाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, नवी दिल्लीछत्तीसगड, हिमाचल प्रदेश, श्रीनगर या भागात 15 नोव्हेंबर रोजी बँका बंद असतील. त्यामुळे बँकिंग क्षेत्राशी निगडित काही काम असेल तर नागरिकांना 16 नोव्हेंबर रोज करता येईल.

शेअर बाजारात लाँग विकएंड

शेअर बाजारात मात्र यावेळी लाँग विकएंड आला आहे. कारण 15 नोव्हेंबर रोजी शेअर बाजार बंद असेल. त्यानंतर शेअर बाजार प्रत्येक शुक्रवार आणि शनिवारी बंद असतो. म्हणजेच 16, 17 आणि 17 नोव्हेंबर अशा सलग तीन दिवस भारतातील शेअर बाजार बंद असेल. म्हणजेच ट्रेडर्स, ब्रोकर्सना आता सलग तीन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेता येणार आहे.

रिझर्व्ह बँकेने याआधीच केली आहे घोषणा

रिझर्व्ह बँकेकडून दरवर्षी बँकांना कोणत्या दिवशी सुट्ट्या असतील, याबाबत सांगण्यासाठी एक यादी प्रसिद्ध केली जाते. या यादीत 15 नोव्हेंबर रोजी बँकांना सुट्टी असेल, असे नमूद आहे.

पुढच्या आठवड्यात 20 नोव्हेंबर रोजी बँका बंद

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर 2020 रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी महाराष्ट्रातील बँका तसेच शेअर बाजाराला सुट्टी असेल.

हेही वाचा :

गुंतवणुकीचे ‘हे’ सहा जबरदस्त पर्याय माहिती आहेत का? लहान मुलांना भविष्यात कधीच पैसे पडणार नाहीत कमी!

NTPC Green Energy आयपीओबाबत मोठी अपडेट समोर, महत्त्वाच्या माहितीने गुंतवणूकदारांना होणार फायदा!

पीएम विद्यालक्ष्मी योजना काय आहे? विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी मिळू शकते अर्थसहाय्य; जाणून घ्या अर्ज कसा करावा?

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.