बॉलिवूडमध्ये राणी मुखर्जी आणि करण जोहर यांची मैत्री सर्वांनाच माहिती आहे. दोघांनी अनेक हिट चित्रपट एकत्र दिले आहेत, ज्यात 'कुछ कुछ होता है', 'कभी अलविदा ना कहना' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र, एकदा या मैत्रीमध्ये एक दिवस असा आला ज्यामुळे राणी करणवर रागावली आणि तिच्या भावना इतक्या तीव्र दुखावल्या गेल्या की ती आमिर खानसमोर रडली. राणीने स्वतः याचा खुलासा केला आहे, ज्यामुळे चाहत्यांना या घटनाक्रमाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
View this post on Instagram
फिल्म इंडस्ट्रीची यशस्वी अभिनेत्री राणी मुखर्जीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 'कुछ कुछ होता है' अभिनेत्रीने सांगितले की ती करण जोहरमुळे आमिर खानसमोर खूप रडली. करण जोहरच्या लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण' चा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये होस्ट करण जोहर पाहुण्या राणी मुखर्जी आणि करीना कपूर खानसोबत बोलताना दिसत आहे. दरम्यान, राणी म्हणते 'कल हो ना हो'बद्दल करण जोहरवर खूप नाराज होती.
हेही वाचा :Kanguva Box Office Collection: कांगुवा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाईसाठी सज्ज, सूर्याचा 'कांगुवा' 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3'चे रेकॉर्ड मोडणार का?
खर सांगू, जेव्हा मला पहिल्यांदा 'कल हो ना हो' चित्रपटाविषयी इतरांकडून कळले तेव्हा मला खूप वाईट वाटले होते. मी तुमच्या खूप जवळची आहे. तुम्ही कोणताही चित्रपट करत असाल तर मला त्याची कथा आधी सांगायला हवी. "तुम्ही कोणताही चित्रपट बनवा, त्या चित्रपटात तुम्ही मला कास्ट केले किंवा नाही, पण तू नेहमीच माझ्याशी तुझ्या चित्रपटांवर चर्चा केली आहेस. मी तुझ्याशी मैत्रीच्या त्या पातळीवर आहे, जिथे तू आरामात राहू शकतोस पण तू माझ्याकडे दुर्लक्ष केलेस, त्यामुळे मी दुःखी होतो."मला तो रोल आवडला होता आणि तो रोल करायची माझी इच्छा होती.राणीच्या म्हणण्यानुसार, करण जोहरने केलेल्या एका गोष्टीमुळे ती खूप दुखावली होती. राणी या गोष्टीमुळे आमिर खान जवळ रडली देखील होती.अशावेळी तिच्या जवळचा मित्र आमिर खान तिच्या सोबत होता, ज्याच्यासमोर तिने आपले दुःख मोकळेपणाने व्यक्त केले.
हेही वाचा :karan arjun re-release date announced: ‘भाग अर्जुन भाग’ ची कल्पना कशी मिळाली? हृतिक रोशनने सांगितला ३० वर्षे जुना किस्सा
दरम्यान'कल हो ना हो'मध्ये शाहरुख खान आणि सैफ अली खानसोबत प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत होती . 'कल हो ना हो' मध्ये जया बच्चन, सुषमा सेठ, रीमा लागू, लिलेट दुबे आणि डेलनाज इराणी यांच्यासह इतर स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले.
कल हो ना हो लवकरच थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान, प्रीती झिंटा आणि सैफ अली खान यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शनच्या अंतर्गत तयार झाला होता, 2003 साली रिलीज झाला होता. 21 वर्षांनंतर, प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या चित्रपटाला मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. 21 वर्षांपूर्वीचे ते जुने क्षण पुन्हा नव्या स्वरूपात पाहायला मिळणार असल्याने, या चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रेक्षकांनी उत्सुकतेने लक्ष केंद्रित केले आहे.