Virat Kohli vs Tilak Verma: चौथ्या T20 सामन्यात 135 धावांनी पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूने चमकदार कामगिरी केली. टॉस जिंकल्यानंतर कर्णधार सूर्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. आणि तिलक वर्मा यांच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघ 283 धावा करण्यात यशस्वी ठरला. या दोघांनी ऐतिहासिक खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 210 धावांची पार्टनरशीप केली. ही भारतासाठी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठीची सर्वात मोठी पार्टनरशीप आहे.
तिलक वर्माचे T20I कारकिर्दीतील दुसरे शतक
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने 47 चेंडूत 9 चौकार आणि 10 षटकार मारत 120 धावा केल्या. त्याचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरे शतक आहे. T20I मध्ये सलग दोन सामन्यांमध्ये शतके करणारा तो एकूण पाचवा भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी गुस्ताव मॅककॉन, रिले रुसो, फिल सॉल्ट, संजू सॅमसन यांनी ही कामगिरी केली आहे. आता तिलकने या फलंदाजांची बरोबरी केली आहे.
कोहलीला टाकले मागे
चौथ्या टी-20 सामन्यात शतक झळकावल्यानंतर तिलक वर्मा आता भारतीय संघासाठी टी-20 द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने भारतीय संघाचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीचा विक्रम मोडला. तिलकने आफ्रिकेविरुद्धच्या T20 द्विपक्षीय मालिकेत दोन शतकांसह एकूण 280 धावा केल्या आहेत. तर कोहलीने 2021 साली इंग्लंडविरुद्धच्या T20 द्विपक्षीय मालिकेत एकूण 231 धावा केल्या होत्या. आता टिलकने कोहलीला मागे टाकले आहे.
सर्वात जलद शतक झळकावणारा तिसरा भारतीय
तिलक वर्मा हा भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या 41 चेंडूत शतक झळकावले. टीम इंडियासाठी टी-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूत शतक झळकावले होते.
T20I मध्ये भारतीय संघासाठी सर्वात जलद शतक झळकावणारे फलंदाज
- रोहित शर्मा- 35 चेंडू
- संजू सॅमसन- 40 चेंडू
- टिळक वर्मा- 41 चेंडू
- सूर्यकुमार यादव- 45 चेंडू
- केएल राहुल- 46 चेंडू