Whos Indias Richest Actress? देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री (Richest Actress) कोण? असा प्रश्न जर विचारला, तर अनेक अभिनेत्रींची नावं धडाधड समोर येतील. पण, नाही... या अभिनेत्री देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री नाहीत. काही दिवसांपूर्वी Hurun India Rich List जाहीर करण्यात आली होती. या लिस्टनुसार, सध्या जुही चावला देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. जुही चावलाचं नेट वर्थ एक हजार कोटी रुपयांच्या आसपास पोहोचलं आहे. पण एक अशी अभिनेत्री होती, जी खूप श्रीमंत होती. तिच्याएवढी श्रीमंत आजतागायत कोणतीच अभिनेत्री होऊ शकलेली नाही. सध्या श्रीमंत अभिनेत्रींमध्ये टॉपवर असलेली अभिनेत्री जुही चावलाही या अभिनेत्री एवढी श्रीमंत नाही. तुम्ही या अभिनेत्रीला ओळखता का?
देशातील आजवरची सर्वात श्रीमंत अभिनेत्री म्हणजे, जयललिता (Jayalalithaa). यांनी अनेक वर्ष फिल्मी दुनियेसोबतच लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. जयललिता तमिळ आणि तेलुगू सिनेमाची टॉप स्टार होती. बॉलिवूडमध्येही जयललिता यांनी अनेक महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं, त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. एमजीआर यांना जयललिता गुरू मानायच्या. एमजीआर यांच्यासोबत जयललिता यांनी जवळपास 28 चित्रपट केले होते.
जयललिता त्या काळातील सर्वात महागड्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. पण जयललिता यांची सर्वाधिक कमाई चित्रपटातून नाही, तर राजकारणात प्रवेश केल्यानंतर झाली. त्यांच्याकडे अनेक महागड्या साड्या आणि बूट होते. सीबीआयनं ज्यावेळी जयललिता यांच्या घरावर छापा टाकला, तेव्हा त्यांच्या घरातून 10 हजार साड्या आणि 28 किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं.
1997 मध्ये, जयललिता यांच्या चेन्नईतील पोस गार्डन येथील घरावर छापा टाकल्यानंतर अधिकाऱ्यांनी आरोप केला की, त्यांनी 188 कोटी रुपयांची संपत्ती दाखवली होती, पण प्रत्यक्षात त्यांनी एकूण 900 कोटी रुपयांची मालमत्ता जमा केली होती. आजच्या हिशोबानं पाहिलं तर, ते 5 हजार कोटी रुपये आहे, जे जुही चावलाच्या अफाट संपत्तीपेक्षा जास्त आहे.
जयललिता यांच्या घरावर टाकलेल्या छापेमारीत त्यांच्या हैराण करणाऱ्या संपत्तीचा उलगडा झाला होता. त्यांच्याकडे तब्बल 10 हजार 500 महागड्या साड्या, 750 बुटांचे जोड, 800 किलो चांदी आणि 28 किलो सोनं सापडलं होतं.
जयललिता या त्यांच्या काळातील टॉप स्टार होत्या, पण कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचल्यानंतर त्यांनी चित्रपटांमधून निवृत्ती घेतली. पण जयललिता यांचा चार्म आणि स्टारडम अबाधित राहिला. त्यांच्या जीवनावरील सात बायोपिकची घोषणा करण्यात आली होती, मात्र काही राजकीय दबावामुळे रिलीज होऊ शकल्या नाहीत. मात्र, काहीजण चित्रपटाच्या पडद्यावर नक्कीच दिसले. मणिरत्नम यांचा 'इरुवर' हा चित्रपटही जयललिता यांच्या जीवनावर आधारित होता. यामध्ये ऐश्वर्या रायनं त्यांची भूमिका साकारली होती. ऐश्वर्याचा हा पहिलाच चित्रपट होता.
शाहरुख, सलमानचा काळ गेला; आता 'हा' देशातला सर्वात महागडा स्टार, एका फिल्मची फी 300 कोटी