Trending : हा बॉयफ्रेंड म्हणतोय 'पाखरा आझाद केलं तूला'; ब्रेकअपनंतर त्यानं प्रियसीला दिला ४४० चा झटका!
esakal December 21, 2024 11:45 PM
Trending :

दररोज अनेक नव्या जोड्या बनतात तर अनेक तुटतात. अनेकांचे ब्रेकअप होतात. यामध्ये हे कारण प्रमुख असते ते म्हणजे प्रियकर किंवा प्रियसीचा एकच नाही तर अनेक जोडीदार असतात. म्हणजे कोणीतरी प्रेमात फसवणूक करणारं असतं. काहीवेळा लोक फसवणूक करणाऱ्याला सोडून देतात तर काहीवेळा ते सूड घेतात.

भारताचा शेजारी असलेल्या देशातही अशीच घटना घडलीय. एका बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंड सोडून गेल्यानंतर असं काही केलं की कोणतीही गर्लफ्रेंड पुन्हा जोडीदाराची फसवणूक करण्याचा विचारही करणार नाही. काय आहे नक्की हे प्रकरण पाहुयात.

त्याचं झालंय असं की, चीनमध्ये राहणारं एक जोडपं २०१८ पासून प्रेमसंबंधात होतं. पण २०२० मध्ये बॉयफ्रेंडला समजलं की संबंधित तरूणी त्याला फसवत आहे. ती दुसऱ्या मुलासोबतही रिलेशनमध्ये आहे. त्यावेळी या मुलाने माघार घेत अगदी शांतपणे तिला सांगितलं की ‘आपण थांबूया’ तेव्हा या मुलीने मी सुधारते स्वत:ला पण तू मला सोडून जाऊ नको. तसेच, या मुलाच्या अकाऊंटवर तिने 300493.15 युयान ट्रान्सफर केले. भारतीय भाषेत ही रक्कम तब्बल ३५ लाख होईल. हे पैसे आपल्या भविष्यासाठी वापरू असे स्वप्नही तिने त्याला दाखवले.

तेव्हा हा मुलगा तयार झाला. मात्र, २०२२ पर्यंत या दोघांचंही नातं अगदी दृष्ट लागण्यासारखं सुरू होतं. पण २०२२ मध्ये पुन्हा या मुलाला तिच्यावर संशय आला. तेव्हा ती याच मुलाच्या भाच्यासोबत रिलेशनमध्ये होती. म्हणजे ती पुन्हा त्याला फसवत होती. तेव्हा या मुलाने तिच्याशी असलेले संबंध तोडून टाकले. त्यानंतर जेव्हा या तरूणीने तिचे पैसे परत मागितले.

तेव्हा या तरूणाने ते देण्यास नकार दिला. तू माझी फसवणूक केलीस त्याची भरपाई म्हणून मी हे ठेऊन घेतोय. असे त्याने सांगितले. त्यानंतर तरुणीने त्याला न्यायालयात खेचले. संतापलेल्या त्याच्या मैत्रिणीने त्याला न्यायालयात नेले. येथे न्यायालयाने संपूर्ण प्रकरण ऐकून घेतले आणि पहिल्याच सुनावणीत मुलाचे म्हणणे स्वीकारले, या संपूर्ण घटनेचे वृत्त साउथ चाइना मॉर्निंग पोस्टवर प्रसिद्ध झाले आहे.  

ही रक्कम ज्या परिस्थितीत देण्यात आली ती नातं टिकवण्याची तडजोड होती. ती कोणती भेटवस्तू नव्हती असे न्यायालयाने म्हटले आहे. अशा परिस्थितीत, ते परत करण्याची आवश्यकता नाही आणि हे पैसे पूर्णपणे त्याच्या मालकीचे आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाने मुलीच्या पायाखालची जमीनच सरकली. सोशल मीडियावर ही बाब समोर येताच लोकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.