सोलापूर: विद्यार्थ्यांमधील विज्ञान बद्दलची जिज्ञासा जागृत करण्यासाठी आणि वैज्ञानिक गुणांना वाव देण्यासाठी सोलापूर सायन्स सेंटर यांच्या सहकार्याने २० आणि २१ डिसेंबर रोजी कॉलेजच्या विज्ञान शाखेच्या बी बिल्डिंगमधील दुसऱ्या मजल्यावर हे प्रदर्शन भरले आहे.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रयोगांचे निरीक्षण करण्याची संधी मिळणार आहे. शहर आणि जिल्ह्यातील इयत्ता दहावीमधील शिक्षकांसोबत २० व २१ डिसेंबर रोजी ११ ते ४ या वेळेत विज्ञान प्रदर्शनास भेट द्यावी तसेच इस्रो आणि विज्ञान भारती यांच्या झालेल्या सामंजस्य करारानुसार या बसच्या भारतभर प्रवासाच्या नियोजनाचे दायित्व विज्ञान भारती या संघटनेला देण्यात आले आहे.
विज्ञान भारतीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक संस्थांशी संपर्क करून त्यांच्या प्रांगणात या बसच्या प्रदर्शनाच्या आयोजनाचे नियोजन केले जात आहे. स्पेस ऑन व्हील्स ही विशेष बस देशभर फिरविण्यात येते. ही बस २० आणि २१ डिसेंबरला संगमेश्वर कॉलेजच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. विज्ञानप्रेमी विद्यार्थी शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कॉलेजच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पेस ऑन व्हील्ससंबंधी
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पेस ऑन व्हील्स’ ही विशेष बस देशभर फिरविण्यात येते. या बसमध्ये इस्रोद्वारानिर्मित विविध प्रक्षेपक, उपग्रह यांच्या प्रतिकृती आणि माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे.
तसेच भारताच्या मंगलयान, चांद्रयान, उपग्रहांच्या दळणवळण व्यवस्था, दूरस्थ संवेदन तंत्र यांचा उपयोग यांच्या विषयी माहिती आहे. देशभरात प्रत्येक राज्यात आणि राज्यातील विविध तालुक्यात ही बस जाते.
बसमधील विविध प्रदर्शने
१) प्रक्षेपणयान (लॉन्च व्हेईकल)
२) प्रक्षेपण तळ (launch pads)
३) उपग्रह उपयोग - दूरस्थ संप्रेषण
४) उपग्रह उपयोग - संदेशवहन
५) नाविक (NaVIC) स्वदेशी स्थितीदर्शक यंत्रणा
६) मंगलयान
७) चांद्रयान १, चांद्रयान -३
९) आर्यभट्ट, रोहिणी भास्कर हे भारतीय उपग्रह
१०) उष्णतारोधी कवच
११) विकास इंजिन.