IND vs WI 2nd Odi : विंडीजचा 115 धावांनी धुव्वा, टीम इंडियाने सामन्यासह मालिका जिंकली
GH News December 25, 2024 01:07 AM

वूमन्स टीम इंडियाने विंडीजवर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 115 धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने विंडीजला विजयासाठी 359 धावांचं आव्हान दिलं होतं. कॅप्टन हॅली मॅथ्यूजने केलेल्या शतकी खेळीमुळे विंडीजला विजयाची आशा होती. मात्र कॅप्टन हॅलीनंतर विंडीजच्या एकाही फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर एक बाजू लावून धरता आली नाही. टीम इंडियाने ठराविक अंतराने झटके देत विंडीजला 46.2 ओव्हरमध्ये 243 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे हॅलीचं शतकही वाया गेलं. टीम इंडियाने यासह हा सामना 115 धावांनी जिंकला. इतकंच नाहीतर मालिकाही जिंकली. टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली.

हॅलीने 109 बॉलमध्ये 13 फोरसह 106 रन्स केल्या. शेमेन कॅम्पबेले हीने 38 धावांचं योगदान दिलं. झायदा जेम्स हीने 25 धावा जोडल्या. ऍफी फ्लेचरने 22 रन्स केल्या. तर इतर कोणलाही 20 पार मजल मारता आली नाही. टीम इंडियाकडून प्रिया मिश्रा हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर दीप्ती शर्मा, तितास साधू आणि प्रतिका रावल या तिघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर रेणुका ठाकुर सिंह हीने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

टीम इंडियाची बॅटिंग

त्याआधी कर्णधार हरमनप्रीत कौर हीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 358 धावा केल्या. टीम इंडियाकडून हर्लीन देओल हीने सर्वाधिक 115 धावांची शतकी खेळी केली. तर प्रतिका रावल 76, स्मृती मंधाना 53 आणि जेमिमाह रॉड्रिग्सने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर इतरांनी चांगली साथ दिली. तर विंडीजकडून चौघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. दरम्यान मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा शुक्रवारी 27 डिसेंबरला होणार आहे.

टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, मालिकाही जिंकली

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन : हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, रशादा विल्यम्स, डिआंड्रा डॉटिन, नेरिसा क्राफ्टन, शेमेन कॅम्पबेले (विकेटकीपर), आलिया ॲलेने, झायदा जेम्स, करिश्मा रामहारक, शमिलिया कोनेल आणि ऍफी फ्लेचर.

वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सायमा ठाकोर, तितास साधू, रेणुका ठाकूर सिंग आणि प्रिया मिश्रा.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.