Melbourne Test Day 1 Weather Report: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील 5 सामन्यांचा मालिकेतील चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या निकालावरच मालिकेची दिशाही ठरणार आहे. टीम इंडियाने या सामन्यात विजय मिळवल्यास मालिका विजयाची संधी निर्माण होईल. या मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेनच्या गब्बा स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये पावसाचा मोठा व्यत्यय आला होता, अशा परिस्थितीत चौथ्या सामन्यात पहिल्या दिवशी हवामान कसे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सामन्यातील हवामानाचा अंदाज जाणून घेऊयात.
पहिल्याच दिवशी खेळाडूंना कडक ऊन पडणार
बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी मेलबर्नमधील हवामान उष्ण असणार आहे. पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान खेळाडूंना मैदानावर प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागेल. त्यामुळे प्रथम क्षेत्ररक्षण करणे सोपे असणार नाही. 26 डिसेंबर रोजी मेलबर्नमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 16 अंशांपर्यंत असू शकते. याशिवाय वाऱ्याचा वेग 28 किलोमीटर प्रति तास असू शकतो. उद्या पावसाची शक्यता फक्त 25 टक्के आहे.
पुढील चार दिवसांत हवामानात बदल होणार
26 डिसेंबर रोजी मेलबर्न कसोटी सामन्यात खेळाडूंना उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. त्यानंतर पुढील चार दिवस हवामानात बदल होईल. 27 डिसेंबर रोजी कमाल तापमान 22 अंश सेल्सिअस राहील आणि 29 आणि 30 डिसेंबरलाही कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस राहील. मात्र, 28 डिसेंबर रोजी पावसामुळे खेळ विस्कळीत होऊ शकतो, या दिवशी पावसाची शक्यता 60 टक्के इतकी आहे.
ऑस्ट्रेलियन संघाची प्लेइंग 11
उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टन्स, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
मेलबर्न कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.