Eggs Price Hike : थंडीत अंड्यांनीही खाल्ला भाव! भडकले दर; आता मोजावे लागणार एवढे पैसे
Times Now Marathi December 26, 2024 12:45 AM

Eggs Price Hike : थंडी वाढल्यामुळे अंड्यांच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. साधारणपणे एका ट्रेमध्ये (30 अंडी) 20 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे डझनभर अंड्यांसाठी आता 80 ते 85 रुपयांपर्यंतचा खर्च होऊ लागला आहे.

राज्यात थंडी वाढली असून तापमान 5 अंशांपेक्षा खाली गेले आहे. नंदुरबारसह इतर अनेक ठिकाणी थंडीच्या तडाख्यामुळे अंड्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या हंगामात, ख्रिसमस आणि नववर्षाच्या सणांमुळे अंड्यांची मागणी वाढते, त्यामुळे दरवर्षी थंडीच्या काळात अंड्यांच्या किंमतीत चढ-उतार होतो.



होलसेल दरात 20 रुपयांची वाढथंडीच्या कालावधीत अंड्यांची मागणी वाढते. त्यामुळे अंड्यांच्या किंमतीत तेजी आली आहे. होलसेल बाजारात अंड्याच्या पाटीचा दर 200 रुपयांवर पोहोचला आहे, जे मागील काही दिवसांपूर्वी 180 रुपये होता. यामुळे किरकोळ बाजारात देखील किंमत वाढली असून, 5 रुपयांमध्ये मिळणारे अंडे आता 7 रुपयांना विकले जात आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.