बिग बजेट बॉलीवूड चित्रपटांची वर्चस्वशाही कधीपर्यंत चालणार? असा प्रश्न प्रत्येक मराठी चित्रपट निर्मात्याला पडतो. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची एक स्वतंत्र ओळख आहे, पण बिग बजेट बॉलिवूड चित्रपटांच्या गाजलेल्या वादळात स्थान मिळवणं हे आजकाल अवघड बनलं आहे.
मुळातच मराठी चित्रपटांना १५० ते २०० स्क्रीन महाराष्ट्रात दिल्या जातात, ज्यामुळे त्यांना लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागतो आणि ते बॉक्स ऑफिसवर धडपडत राहतात. परंतु आता बिग बजेट चित्रपटांच्या वर्चस्वामुळे रुखवत ह्या मराठी चित्रपटाला केवळ ४० स्क्रीन मिळाल्या.
अशा परिस्थितीतही, मराठी प्रेक्षकांनी या चित्रपटाला दिलेला प्रतिसाद खरोखरच कौतुकास्पद आहे. मराठी माणसांच्या प्रामाणिक पाठिंब्यामुळे आणि परंपरा व संस्कृतीशी नाते जोडलेल्या कथानकामुळे हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच हाऊसफुल्ल झाला आहे.
पुष्पा आणि बेबी जॉनसारख्या बिग बजेट सिनेमांना टक्कर देऊन अल्ट्रा मीडिया & एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत, रब्री प्रोडक्शन निर्मित आणि निर्माती “रुखवत” हा चित्रपट सिनेगृहात गाजतोय. ‘रुखवत’ म्हणजे महाराष्ट्रातील जुनी परंपरा, परंतु ही मराठमोळी परंपरा लोकांपर्यंत जास्त पोहचू शकत नाही, यावर अल्ट्रा मीडिया & एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ श्री सुशीलकुमार अग्रवाल यांनी खंत व्यक्त केली आहे.
मराठी इंडस्ट्रीमध्ये चित्रपटांची सर्वोत्तम आणि दर्जेदार कहाणी असली तरी बिग बजेट सिनेमांमुळे मराठी चित्रपटांना थिएटर्स मध्ये स्क्रीन उपलब्ध होत नाही. यामुळे मराठी मातीतले चित्रपट लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. रुखवत ह्या चित्रपटासोबत ही हेच झालेले आहे.
परंपरा आणि सांस्कृतिक महत्त्व घेऊन रुखवत हा सिनेमा आलेला आहे. परंतु ह्या चित्रपटाला ही कमी स्क्रीन्स मिळाल्यामुळे हा रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकत नाही. आता पर्यंत असे खूप मराठी सिनेमे आले आहेत जे बिग बजेट सिनेमांमुळे खुलून येत नाहीत.
रुखवत ह्या चित्रपटामध्ये खास आकर्षण संतोष जुवेकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्यांसोबतचं अशोक समर्थ,अभिजीत चव्हाण आणि राजेंद्र शिसातकर हे ‘रुखवत’ या चित्रपटात खास भूमिकेत आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम प्रधान यांनी केले आहे. ज्यांनी आपल्या कथा आणि चित्रणाद्वारे रुखवतमध्ये सांस्कृतिक धारा आणि थ्रिलर कथानक यांचे सुंदर मिश्रण साकारले आहे. रुखवत हा चित्रपट अल्ट्रा मीडिया & एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत, रब्री प्रोडक्शन निर्मित आणि निर्माती ब्रिंदा अग्रवाल द्वारे २७ डिसेंबर पासून सिनेमागृहात प्रदर्शित झालेला आहे.