सध्याच्या जमान्यात लोकांना रील बनवण्याचे वेड आहे आणि हा वेड इतके वाढला आहे की लोक त्यासाठी काहीही करत आहेत. काहीजण आपला जीव धोक्यात घालून रील्स बनवत आहेत, तर काही जण अश्लील डान्सची रील बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये लोक वेगवेगळ्या प्रकारे रील बनवताना दिसतात. सध्या एका काकूंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एका काकू धक्कादायक अशी जिवावर बेतणारी कृती करताना दिसत आहेत. या महिलेने रस्त्याच्या मधोमध खुर्ची ठेवली असून त्यावर सामान ठेवल्याचे व्हिडिओत दिसत आहे. महिलेने फोनचा कॅमेरा ऑन केला आणि रील काढण्यासाठी रस्त्यावर नाचू लागली. हे दृश्य खरोखरच धक्कादायक होते, कारण रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाले. लोक त्यांच्या वाहनांमध्ये अडकले होते. महिलेच्या या कृतीमुळे वाहतूक कोंडी झाली आणि लोकांना आश्चर्याचा धक्का बसला काहींनी याचा व्हिडिओ देखील बनविला.
रस्ता अडवून रिलव्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिला रस्त्याच्या मधोमध नाचतानाचा व्हिडिओ बनवत होती, त्यामुळे ट्रॅफिक जाम आणखीनच वाढले. कॅमेऱ्यात हे दृश्य शूट करणा-या व्यक्तीने सांगितले की, जेव्हा तो रस्त्यावर पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की एक महिला रस्त्याच्या मधोमध रील बनवत होती. ट्रॅफिकमध्ये अडकलेले लोक तिची कृती पाहत होते आणि त्यांना त्रास होत होता. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याचे या महिलेचे ध्येय होते, त्यामुळे तिने हे पाऊल उचलले. रस्त्यात व्हिडीओ काढण्यासाठी महिलेचे हे वर्तन इतरांसाठी गैरसोयीचे ठरले होते.
लोकांच्या संतप्त प्रतिक्रियाहा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक महिलेचे हे पाऊल मूर्खपणाचे मानत आहेत, कारण रस्त्यावर ट्रॅफिक जाम असतानाही ती तिच्या व्हिडिओला प्राधान्य देत होती. या व्हिडिओबाबत अनेक मीम्स आणि प्रतिक्रिया व्हायरल होत असून, तो चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी महिलेने जे काही केले ते आता लोकांमध्ये हास्याचे आणि टीकेचे कारण बनले आहे. हा व्हिडिओ दर्शवितो की लोक कधीकधी सोशल मीडियावर लोकप्रियता मिळविण्यासाठी काहीही करण्यास तयार होतात पण ते दुस-यांचा थोडा देखील विचार करत नाहीत. हा व्हिडिओ X वर @sarikatyagi97 नावाच्या हँडलवर शेअर करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी अशाच एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात ती महिला आपल्या लहान मुलाला सोडून रिल बनविण्यात मग्न होती. आणि ते मूल हायवेवर पोहचले होते. तिच्या मोठ्या मुलाने ही गोष्ट तिच्या लक्षात आणून दिली. मग ती धावत मुलामागे गेली आणि मोठा अनर्थ टळला. त्यावेळी देखील लोकांनी संताप व्यक्त करत त्या महिलेला सोशल मीडियावर चांगलेच सुनावले होते.