Gold Rate Today नवी दिल्ली: नववर्षाच्या पहिल्या दिवशी सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. तर, चांदीच्या दरामध्ये घसरण झाल्याचं देखील दिसून आलं. 24 कॅरेट सोन्याच्या दरात सरासरी 372 रुपयांनी वाढ झाली. 10 ग्रॅम सोन्याचे दर 76534 रुपयांवर पोहोचले. चांदीच्या दरात मात्र 117 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. चांदीचा एक किलोचा दर 85900 रुपये पाहायला मिळाला. हे दर आयबीएकडून जारी करण्यात आलेले असून हे दर जीएसटीशिवायचे आहेत. तुमच्या शहरांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात 1000 ते 2000 रुपयांचं अतंर पाहायला मिळू शकतं.
23 कॅरेट सोन्याचा दर आज 371 रुपयांनी महागला असून 10 ग्रॅमसाठी 76228 रुपये मोजावे लागतील. 22 कॅरेट सोन्याच्या दरात देखील 341 रुपयांची वाढ झाली. याचा 10 ग्रॅमचा दर 70105 रुपये आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात देखील279 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅमचा दर 57401 रुपये इतका आहे. 14 कॅरेट सोन्याचा दर 217 रुपयांनी वाढून 44772 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
सोनं खरेदी करण्यापूर्वी किंमतीची पडताळणी करुन घेणं आवश्यक आहे. ज्या दिवशी तुम्हाला सोने खरेदी करायची आहे तेव्हा तुम्ही इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटला भेट देऊन दर पाहू शकता. सोन्याचे 24 कॅरेट,22 कॅरेट,18 कॅरेटचे दर वेगवेगळे असतात.
सोन्याच्या दागिण्यांची खरेदी करताना वजनाची अचूक पडताळणी करणं आवश्यक आहे. सोने खरेदी करताना वजनात फरक झाल्यास देखील मोठं नुकसान होऊ शकतं. हॉलमार्कवालं सोनं खरेदी करताना बिलाची मूळ प्रत घेणं आवश्यक आहे. त्यावर प्रत्येक गोष्टींची नोंद असणं आवश्यक आहे. दागिन्यांची खरेदी करताना ज्वेलर्सकडून मेकिंग चार्जेस आकारले जातात. यामध्ये थोडीशी सवलत मिळू शकते.
एमसीएक्सवर सोन्याच्या दरात 147 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. एमसीक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 76894 रुपये होता चांदीच्या दरात एमसीक्सवर 147 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. तिथं एक किलो चांदीचा दर 87380 रुपये होता.
नवी दिल्लीचंदीगड, जयपूर, लखनौ या शहरांमध्ये सोन्याच्या दरात 440 रुपयांची वाढ झाली. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 78150 रुपये आहे. मुंबईचेन्नई, कोलकाता, बंगलोर, हैदराबाद, नागपूर या शहरात देखील सोनं 440 रुपयांनी वाढलं असून 10 ग्रॅमचा दर 78000 रुपये आहे. तर, अहमदाबाद आणि पाटणा येथे सोन्याच्या दरात 440 रुपयांची वाढ झाली. इथं 10 ग्रॅम सोन्याचा दर 78050 रुपये आहे.
इतर बातम्या :
अधिक पाहा..