Ileana D'Cruz : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सोशल मिडीयावर मागील वर्षभरात चर्चेत असून आता पुन्हा इलियाना प्रसिद्धीझोतात आली आहे. इलियाना आणि तिचा नवरा मायकल डोलन यांनी इंस्टाग्रामवर एका व्हिडिओद्वारे 2024 चे संस्मरणीय क्षण शेअर केले, परंतु लोकांचे लक्ष वेधून घेतले ते ऑक्टोबर 2024 मधील क्लिप, ज्यामध्ये इलियाना गर्भधारणा चाचणी किट धरून दिसली.
इलियाना होणार दुसऱ्यांदा आई?
ने तिचे 2024 चे अनुभव शेअर करताना प्रत्येक महिन्याचा एकत्रित व्हिडिओ पोस्ट केला आहे. जरी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा आईबद्दल स्पष्टपणे काहीही लिहिलेले नाही. पण ऑक्टोबरच्या क्लिपमध्ये ती भावूक दिसत होती आणि तिच्या हातात गर्भधारणा चाचणी किट होती. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अशा स्थितीत इलियाना आणि मायकेल डोलन यांच्या कुटुंबात आणखी एक सदस्य लवकरच सामील होणार आहे का? असा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.
इलियानाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'लव. पीस. काइंडनेस. आशा आहे की 2025 देखील आनंदात जाईल. पोस्टमध्ये गर्भधारणेबद्दल थेट काहीही सांगितले नसले तरी, तिच्या फोटो आणि व्हिडीओंनी चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. काही फॉलोअर्सनी तर थेट, 'तू पुन्हा गरोदर आहेस का?' असा प्रश्न तिला विचारला
चाहत्यांचा उत्साह वाढला
इलियाना आणि मायकल यांनी त्यांचे लग्न खाजगी ठेवले होते, परंतु ऑगस्ट 2023 मध्ये बाळा कोआच्या जन्मानंतर त्यांच्या लग्नविषयी सर्वांना सांगितले. या जोडप्याने त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवसही मोठ्या थाटामाटात साजरा केला. जर चाहत्यांचा अंदाज खरा ठरला तर त्यांच्यासाठी ही आणखी एक चांगली बातमी असू शकते. मात्र, आतापर्यंत इलियाना किंवा मायकल या दोघांनीही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, त्यामुळे त्यांचे चाहते या बातमीची पुष्टी होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.