influential cricket administrator requested to Gautam Gambhir: मागील तीन दिवस भारतीय क्रिकेटमध्ये बरंच काही घडलं... इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीने टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील संवाद जगासमोर आणला, त्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पत्रकार परिषदेत येऊन मेलबर्न कसोटीत खेळण्यावर संभ्रमाचं वातावरण निर्माण करून गेला. त्यात मेलबर्न कसोटीच्या दिवशी जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा कर्णधार म्हणून नाणेफेकीला आला. रोहितने स्वतः या कसोटीतून विश्रांती मागितल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे रोहितची कसोटी कारकीर्द बॉक्सिंग डे कसोटीतच संपल्याची चर्चा सुरू झाली आहे.
story behind Rohit's sydney game and the big call रोहितला सिडनी येथे सुरू झालेल्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेत रोहितला ३ सामन्यांत फक्त ३१ धावा करता आल्या आहेत. त्याने त्याच्या फलंदाजीच्या क्रमातही बदल करून पाहिला, परंतु तो मोठी धावसंख्या करू शकला नाही. सिडनी कसोटीसाठी त्याच्या जागी शुभमन गिलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली.
PTIने दिलेल्या वृत्तानुसार, रोहितला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवण्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला एका 'प्रभावी क्रिकेट प्रशासका'कडून विनंती करण्यात आली होती. पण, भारताच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेच्या फायनलच्या आशांसाठी हा सामना महत्त्वाचा असल्याने त्याने ती विनंती नाकारली.
"बीसीसीआयमध्ये खूप आदर असलेल्या एका प्रभावशाली क्रिकेट प्रशासकाने रोहितला सिडनीचा सामना खेळण्याची आणि मैदानातून निवृत्ती घेण्याची संधी दिली जाऊ शकते का, यासाठी मुख्य प्रशिक्षकाशी चर्चा केली होती. तथापि , सिडनीमध्ये भारताचा विजय सुनिश्चित करणे आणि WTC फायनलमध्ये स्थान मिळवणे हे मुख्य प्रशिक्षकाचे प्राधान्य आहे,” असे PTIच्या अहवालात दावा करण्यात आला आहे.
Pink Test साठी नाणेफेकीला आलेला जसप्रीत बुमराह म्हणाला, रोहित हा आमचा कर्णधार आहे आणि त्याने नेतृत्व कौशल्य दाखवले आहे. त्याने या सामन्यात विश्रांती करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आमच्या संघात एकसंघता दिसते आणि यात कोणताच स्वार्थ नसल्याचेही दिसते.संघासाठी काय महत्त्वाचे आहे, आम्ही तसा निर्णय घेतो.