Indian Railways: रेल्वेने या गाड्या बंद करून केली पंचाईत, कोकणवासियांचे होणार वांदे
Kokan Trains Issue: दिवा-रत्नागिरी आणि दिवा-दादर या मार्गांची क्षमता नसल्याचे कारण देत त्या मार्गावर चालणाऱ्या गाड्या बंद करण्यात आल्या; मात्र मध्य रेल्वे प्रशासनाने त्याच मार्गावर दादर-गोरखपूर (चार दिवस) आणि दादर-बलिया (तीन दिवस) विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. 1 जानेवारीपासून नवीन वेळापत्रकात या गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. याचा अर्थ, या गाड्या आता कायमस्वरूपी सुरू आहेत.
कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचा तीव्र विरोधकोकण आणि मुंबईतील रेल्वेगाड्या महाराष्ट्राच्या बाहेर नेण्याच्या या निर्णयाला कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने तीव्र विरोध केला आहे. संघटनेचे सचिव अक्षय म्हापदी यांनी सांगितले की, 1996-97 मध्ये रत्नागिरी लोकमान्य टिळक टर्मिनस मार्गावर एक पॅसेंजर गाडी सुरू केली गेली.
दादर स्थानक सोयीचेपुढे प्रवाशांच्या मागणीनुसार ती रत्नागिरी-दादर पॅसेंजर म्हणून चालवली जाऊ लागली. मार्च 2020 पर्यंत ही गाडी प्रवाशांच्या सेवेत होती. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, उत्तर मुंबई, वसई, नालासोपारा, विरार आणि गुजरात दिशेने येणाऱ्या प्रवाशांसाठी दादर स्थानक सोयीचे होते.
वेळेचे पालन करण्यास अडचणपरंतु कोरोनाच्या निमित्ताने मध्य रेल्वेने सप्टेंबर 2021 पासून ही गाडी बंद केली आणि मार्गाची क्षमता नसल्याचे आणि वेळेचे पालन करण्यास अडचण असल्याचे कारण दिले. त्यानंतर शून्य आधारित वेळापत्रकात दिवा-रत्नागिरी पॅसेंजर सुरू केली गेली.
प्रवाशांचा त्रास वाढलामात्र, आजही रत्नागिरी पॅसेंजरच्या वेळेत कोणतीही सुधारणा झालेली नाही. उलट, दादरवरून येत असताना गाडीत पाणी भरले जात असल्यामुळे ती गाडी पनवेलहून थेट निघू शकली असती, पण दिव्यात अशी सोय नसल्यामुळे, ये-जा करताना पनवेलला 10 ते 20 मिनिटे वाया जातात. यामुळे मागील गाड्यांना पुढे नेण्याची वेळ येते आणि त्यामुळे अजून अर्धा तास वाया जातो. परिणामी, गाडी दादरहून दिव्याला नेल्यामुळे वेळेत सुधारणा झाली नाही, उलट प्रवाशांचा त्रास वाढला आहे.
या गाड्या बंद करण्यात आल्यातसेच, शून्य आधारित वेळापत्रकात मुंबई, कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस, भुसावळ-मुंबई पॅसेंजर, पुणे-कर्जत पनवेल पॅसेंजर, मनमाड मुंबई गोदावरी एक्स्प्रेस अशा महाराष्ट्रातील आणि इंटरसिटी गाड्या बंद करण्यात आल्या आहेत.
त्या गाड्या कायम ठेवाव्यात - अक्षय महापदीकोकण रेल्वेमार्गावर महाराष्ट्रासाठी आधीच गाड्यांची कमतरता असताना, सेवेत असलेल्या गाड्यांची अशी विल्हेवाट लावून प्रवाशांना त्रास देण्याचा विरोध आम्ही करतो. रेल्वे प्रशासनाने नवीन गाड्यांच्या बाबतीत प्रयोग करावेत, पण पूर्वी चालू असलेल्या गाड्या मुंबईबाहेर न नेता, त्या गाड्या कायम ठेवाव्यात अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी केली आहे.