पालकमंत्र्यांची यादी जाहीर, बीड आणि पुण्याबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमचा पालकमंत्री कोण?
Marathi January 19, 2025 06:24 AM

मुंबई : राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून पालकमंत्रिपदाचा मुद्दा चर्चेत आला होता. विशेष म्हणजे पालकमंत्रिपदाच्या यादीतून मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आलाय.

पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी

1. गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
2. ठाणे – एकनाथ शिंदे
3. मुंबई शहर – एकनाथ शिंदे
4. पुणे – अजित पवार
5. बीड – अजित पवार
6. नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
7. अमरावती चंद्रशेखर बावनकुळे
8. अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
9. वाशिम – हसन मुश्रीफ
10. सांगली – चंद्रकांत पाटील
11. नाशिक – गिरीश महाजन
12. पालघर – गणेश नाईक
13. जळगाव -गुलाबराव पाटील
14. यवतमाळ – संजय राठोड
15. मुंबई उपनगर – आशिष शेलार  तर सहपालकमंत्री – मंगलप्रभात लोढा
16. रत्नागिरी – उदय सामंत
17. धुळे – जयकुमार रावल
18. जालना – पंकजा मुंडे
19. नांदेड – अतुल सावे
20. चंद्रपूर – अशोक उईके
21.सातारा – शंभूराज देसाई
22. रायगड – आदिती तटकरे
23.लातूर – शिवेंद्रराजे भोसले
24. नंदूरबार – माणिकराव कोकाटे
२५.सोलापूर – जयकुमार गोरे
26. हिंगोली – नरहरी झिरवाळ
27. भंडारा – संजय सावकारे
28. छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
29. धाराशिव – प्रताप सरनाईक
30. बुलढाणा – मकरंद जाधव
३१. सिंधुदुर्ग – नितेश राणे
32. अकोला – आकाश फुंडकर
33. गोंदिया -बाबासाहेब पाटील
३४. कोल्हापूर – प्रकाश आबिटकर तर सह पालकमंत्री – माधुरी मिसाळ
35. वर्धा – पंकज भोईर
३६.परभणी – मेघना बोर्डीकर

गडचिरोलीचे पालकमंत्री पद मुख्यमंत्र्यांकडे तर बीड आणि पुण्याचे पालकमंत्रीपदी अजित पवार

मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री पद एकनाथ शिंदेकडे

नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री पदी चंद्रशेखर बावनकुळे असतील

छ.संभाजीनगर पालकमंत्री पद संजय शिरसाट यांच्याकडे तर पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचा कारभार

मुंबई उपनगराचे दोघांकडे पालकत्व –
आशिष शेलार यांच्याकडे पालकमंत्री पद तर मंगलप्रभात लोढा सहपालकमंत्री असणार

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांना कोणतेही जिल्ह्याचे पालकमंत्री पद नाही किंवा सह पालकमंत्री पद देखील नाही.

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी नाही

नाशिकच्या पालकमंत्री पदाची धुरा अखेर गिरीश महाजन यांच्याकडे…

नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन आणि दादा भुसे, माणिकराव कोकाटे या मंत्र्यांची नावे होते चर्चेत…

नाशिकच्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन यांची वर्णी तर दादा भुसे यांच्याकडे कोणतीही जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी नाही… यामुळे नव्या चर्चांना उधाण येण्याची शक्यता



Maharashtra Guardian Ministers List : पालकमंत्र्यांची यादी जाहीर, बीड आणि पुण्याबाबत सरकारचा मोठा निर्णय; कोणत्या मंत्र्याकडे कोणता जिल्हा? संपूर्ण यादीइतर महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मारकडवाडीत वात पेटली, धग मात्र दिल्लीत, उत्तमराव जानकर 23 तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार, जंतर मंतरवर करणार आंदोलन

Vinod Tawde : अमित शाह यांची तडीपारी देशभक्तीचे लक्षण; सावरकर मंत्री झाले असते तर शरद पवार असंच बोलले असते का? विनोद तावडेंचा पलटवार

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.