This years Ganeshotsav will be held as per court orders and will be eco-friendly
Marathi January 19, 2025 06:24 AM


गतवर्षी मुंबई उच्च न्यायालयाने गणेशमूर्ती बनविण्यासाठी सरसकट पीओपीचा वापर करण्यास मनाई केली होती. त्यानंतरही गणेशोत्सव समिती, मूर्तिकार, गणेशोत्सव मंडळे, लोकप्रतिनिधी यांच्या मागणी आणि विनंतीवरून तत्कालीन राज्य सरकार व मुख्यमंत्री यांनी त्याबाबत तोडगा काढून सवलत दिली. मात्र यंदा पीओपी गणेशमूर्तीबाबत सरकार व महापालिका न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा कण्यावर जोर देणार असल्याचे प्रतिपादन मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी केले आहे.

मुंबई (मारुती मोरे) : केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या काही वर्षांपासून शाडू मातीची गणेशमूर्ती बनवून आणि सजावटही पर्यावरणपूरक ठेवून गणेशोत्सव साजरा करण्यावर जोर दिला आहे. तर, गतवर्षी मुंबई उच्च न्यायालयाने गणेशमूर्ती बनविण्यासाठी सरसकट पीओपीचा वापर करण्यास मनाई केली होती. त्यानंतरही गणेशोत्सव समिती, मूर्तिकार, गणेशोत्सव मंडळे, लोकप्रतिनिधी यांच्या मागणी आणि विनंतीवरून तत्कालीन राज्य सरकार व मुख्यमंत्री यांनी त्याबाबत तोडगा काढून सवलत दिली. मात्र यंदा पीओपी गणेशमूर्तीबाबत सरकार व महापालिका न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा कण्यावर जोर देणार असल्याचे प्रतिपादन मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी केले आहे. (This years Ganeshotsav will be held as per court orders and will be eco-friendly)

मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क विभागाच्यावतीने आयोजित ‘श्री गणेश गौरव स्पर्धा – 2024’ पुरस्कारांचे वितरण अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपआयुक्त (परिमंडळ-2 ) प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) तथा सहायक आयुक्त (डी विभाग) शरद उघडे यांच्या हस्ते आज, शुक्रवारी (17 जानेवारी) मुंबई महापालिकेच्या सभागृहात उत्साहात करण्यात आले. तसेच, परिमंडळनिहाय सर्वोत्तम नैसर्गिक गणेशमूर्ती विसर्जन स्थळ व कृत्रिम गणेशमूर्ती विसर्जन स्थळ स्पर्धा – 2024 अंतर्गत प्रशासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

मुंबईतील गणेशोत्सव हा देशातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील गणेशोत्सव निर्विघ्नपणे आणि उत्साहात पार पडला. यंदा सुमारे 82 हजार गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. महापालिका प्रशासन, पोलीस दल, बेस्ट आणि अन्य यंत्रणांच्या मदतीने हा उत्सव साजरा होऊ शकला. 2025 सालचा गणेशोत्सवही इतक्याच धुमधडाक्यात व्हायला हवा. पण, प्रत्येक मंडळाने आणि पदाधिकाऱ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठीच पुढाकार घ्यावा, असे आवाही अमित सैनी यांनी यावेळी केले.

हेही वाचा – Parking Issiue : पार्किंगची समस्या ठरतेय डोकेदुखी, प्रशासन जपानी मॉडेल राबवण्याच्या विचारात

प्रास्ताविकात उपआयुक्त (परिमंडळ-2) प्रशांत सपकाळे म्हणाले की, मुंबई महापालिकेच्यावतीने गणेशोत्सवादरम्यान तसेच गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान आवश्यक विविध सोयीसुविधा पुरविल्या जातात. शाडू मातीची मूर्ती, कृत्रिम तलावात मूर्तींचे विसर्जन आदी उपक्रमांमुळे हा उत्सव अधिक चांगला झाला. मात्र आता न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे ॲड. नरेश दहिबावकर यांनी गणेश मंडळांना केले. तसेच, पूर्व उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे सुरेश सरनौबत यांनी महापालिकेतर्फे मुंबईतील गणेशोत्सवात चांगले सहकार्य आणि सेवासुविधा लाभत असल्याचे सांगितले.

श्री गणेश गौरव स्पर्धा – 2024 मधील विजेते गणेश मंडळ

  1. प्रथम पारितोषिक (रु. 75,000/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)
    स्वप्नाक्षय मित्र मंडळ, सातबंगला, अंधेरी (पश्चिम)
  2. द्वितीय पारितोषिक (रु. 50,000/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)
    पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, बावला मस्जिद, करीरोड (पश्चिम)
  3. तृतीय पारितोषिक (रु. 35,000/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)
    युवक उत्कर्ष मंडळ, गेट नंबर 06, मालवणी, मालाड (पश्चिम)

हेही वाचा – City Bus Shortage : राज्यात 1 लाख प्रवाशांमागे फक्त 60 बसेस, सर्वेतून ही माहिती समोर


Edited By Rohit Patil



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.