Sanjay Shirsat : ‘उद्धव ठाकरे यांच्या बेडरूममध्ये हा जायचा, कशा अवस्थेत बघितलं….’, संजय शिरसाट यांची जीभ घसरली
GH News January 21, 2025 04:12 PM

“मी अनेक लोकं पाहिली आहेत, ज्यांनी लोकांना छळलं, ज्यांनी लोकांच वाटोळ केलं. त्यांचं वाटोळ होताना मी पाहिलं आहे. म्हणून दुसऱ्याच वाईट चिंतन केलं, तर तुमच वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. नंदू बरं झालं, तुला लवकर अक्कल आली. तू आमच्याकडे आलास” असं आमदार आणि मंत्री संजय शिरसाट एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. नंदू सकाळी 6 वाजता खैरेकडे जायचा, 8 वाजता अंबादासकडे. शेवटी त्याला कळलं, दोघांकडे काही राहिलेलं नाही. आता एकमेव संजय शिरसाट आहे. नंदू किती हुशार आहे पाहा, 1 तारखेला खैरेचा वाढदिवस असतो, त्याने सगळीकडे बॅनर लावले आणि 2 तारखेला माझ्याकडे प्रवेश केला” असं संजय शिरसाट म्हणाले.

त्यावेळी संजय शिरसाट यांची मंचावर बसलेल्या अशोक पटवर्धन यांचं नाव घेऊन बोलताना जीभ घसरली. “आम्हाला उद्धव ठाकरेंच्या साध्या रुममध्ये प्रवेश नव्हता. हा पटवर्धन उद्धव ठाकरे यांच्या बेडरूममध्ये जायचा, त्याने कशा अवस्थेत बघितलं असेल काय माहित” असं संजय शिरसाट बोलले. “हा अशोक पटवर्धन ठाकरे गटाचा मराठवाडा महासचिव होता. तो का दूर गेला?. मराठवाड्यात महासचिव राहिलेला दूर जातोय, काही कारण असेल की नाही” असं संजय शिरसाट म्हणाले.

‘या निवडणुकीत पैसे जास्त लागले’

“काल दांडे मारणारे, आज सॅल्युट मारत आहेत. माझी 40 वर्षे संघर्ष करण्यात गेली. जवळच्या लोकांनी सोडले. पालकमंत्री मंत्री म्हणजे काही राजा नाही, तुमच्यातीलच आहे मी. या निवडणुकीत पैसे जास्त लागले, पण मीही मोकळा हात केला. एक वेळ होती दोन दोन दिवस उपाशी असायचो, आता खायला वेळ नाही. अडीच वर्षे मी पक्षाची खिंड लढवली” असं संजय शिरसाट म्हणाले. “तिकडून ( मातोश्री )आदेश आला, संजय शिरसाट यांना पाडा. कपट कारस्थान करणाऱ्या माणसाने व्हॉटस अप चाट शिंदे यांना दाखवला आणि मला कसे मंत्री करू नये असा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे जेव्हा पाठीशी उभे राहतात, तेव्हा चिंता करायची गरज नाही” असं संजय शिरसाट म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.