IAS And IPS Sister: या दोन बहिणींचा नादच खुळा! गरिबीवर मात करत एक झाली IPS तर दुसरी IAS
Sarkarnama February 13, 2025 08:45 PM
IAS And IPS Sister

एक बहीण IAS तर दुसरी IPS ही सक्सेस स्टोरी आहे. दोन बहीणीची ज्यांनी गरीबीवर मात करत UPSC क्रॅक केली आणि त्यांचे स्वप्न पूर्ण केले.

IAS And IPS Sister हालाकीची परिस्थिती

तामिळनाडू येथील कुड्डालोर या जिल्ह्यात राहणाऱ्या ईश्वर्या आणि सुष्मिता या दोन बहीणी, ज्यांची घरची परिस्थिती हालाकीची अन् प्रचंड संघर्षमय.

IAS And IPS Sister त्सुनामी दरम्यान गेले घर

2004 ला आलेल्या त्सुनामी दरम्यान त्यांचं घर गेलं. यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. अशा स्थितीत त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले.

IAS And IPS Sister IAS ईश्वर्या रामनाथन

खडतर परिस्थितीवर मात करत ईश्वर्या यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. आयएएस व्हायचे स्वप्न मनात ठेवून यूपीएससीची तयारी सुरु केली.

IAS And IPS Sister 47 वा क्रमांक

पहिल्याच प्रयत्नात UPSC ची परीक्षा पास करत 630 वा रँक मिळवला. ईश्वर्या यांची भारतीय रेल्वे खातेसाठी निवड झाली. पण त्यांना IAS अधिकारी व्हायचं होतं. त्यामुळे त्यांनी 2019 मध्ये पुन्हा UPSC परीक्षा दिली अन् 47 वा क्रमांक मिळवला.

IAS And IPS Sister सुष्मिता रामनाथन

मोठी बहीण IAS असल्याने सुष्मिताला UPSC चे धडे घरातूनचं मिळाले. त्यांनी UPSCची परीक्षा तब्बल 5 वेळा दिली. पाचही वेळा अपयश येऊनही त्यांनी हार मानली नाही.

IAS And IPS Sister 528 वा रँक

2022 ला त्यांनी पुन्हा UPSC परीक्षा दिली आणि 528 वा रँक मिळवला. आयपीएस अधिकारी निवड झाली.

IAS And IPS Sister प्रेरणादायी

ईश्वर्या रामनाथन आणि सुष्मिता रामनाथन या दोन बहिणींनी दाखवून दिले, की आपला निर्णय आणि ध्येय ठाम असतील तर आपण कठीणातील कठीण परिस्थितीवर मात करु शकतो.

NEXT : कमालीची हुशारी,अफाट डेअरिंग अन् सोज्वळ सौंदर्य यांचं 'सुपर कॉम्बिनेशन'...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.