Australia vs England: चॅम्पियन्स ट्रॉफी २५ स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ५ विकेट्सने पराभूत केले. शनिवारी (२२ फेब्रुवारी) लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ७०० हून अधिक धावांचा पाऊस पडला. त्यामुळे या सामन्यात मोठे विश्वविक्रमही नोंदवले गेले.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ८ बाद ३५१ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून १४३ चेंडूत बेन डकेटने १६५ धावांची खेळी केली. तसेच त्याने जो रुटसोबत १५४ धावांची भागीदारीही केली. जो रुटने ६८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेन ड्वारशुईने ३ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर ३५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने ४७.३ षटकात ५ विकेट्स गमावत ३५६ धावा करून पूर्ण केला.
ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिसने ८६ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांसह १२० धावांची खेळी केली. तसेच मॅथ्यू शॉर्टने ६३ आणि ऍलेक्स कॅरेने ६९ धावांची अर्धशतकी खेळी केली. मार्नस लॅबुशेनने ४७ धावा केल्या. इंग्लंडकडून पाच गोलंदाजांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
या सामन्यात झालेले विक्रम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वोच्च धावाया सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांनी सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. त्यामुळे एकाच सामन्यात दोनवेळा हा विश्वविक्रम मोडला गेला.
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील संघाच्या एका डावातील सर्वोच्च धावा३५६/५ - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर, २०२५
३५१/८ - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर, २०२५
३४७/४ - न्यूझीलंड विरुद्ध युएसए, २००४
३३८/४ - पाकिस्तान विरुद्ध भारत, द ओव्हल, २०१७
३३१/७ - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कार्डिफ, २०१३
३२३/८ - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, २००९
ऑस्ट्रेलियाने आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा नोंदवला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने वनडेत दुसऱ्या क्रमांकाच सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.
आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग३५६/५ - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, २०२५
३४५/४ - पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, २०२३
३२९/७ - आयर्लंड विरुद्ध इंग्लंड, २०११
३२२/४ - बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड
३२२/३ - श्रीलंका विरुद्ध भारत, २०१७
३५९/६ - विरुद्ध भारत, मोहाली, २०१९
३५६/५ - विरुद्ध इंग्लंड, लाहोर, २०२५
३३४/८- विरुद्ध इंग्लंड, सिडनी, २०११
इंग्लंडचा बेन डकेट चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वोच्च धावांची खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे तो १५० धावांचा टप्पा पार करणारा पहिलाच खेळाडूही आहे. याशिवाय इंग्लंड पराभूत झाल्यामुळे तो आयसीसी वनडे स्पर्धेत पराभूत संघाकडून सर्वोच्च धावांची खेळी करणाराही फलंदाज ठरला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वोच्च धावांची खेळी करणारे फलंदाज१६५ धावा - बेन डकेट (इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर, २०२५)
१४५ नाबाद धावा - नॅथन ऍस्टल (न्यूझीलंड विरुद्ध अमेरिका, द ओव्हल, २००४)
१४५ धावा - अँडी फ्लॉवर (इंग्लंड विरुद्ध भारत, कोलंबो, २००२)
१४१ नाबाद धावा - सौरव गांगुली (भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नैरोबी, २०००)
१४१ धावा - सचिन तेंडुलकर, (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ढाका, १९९८)
१६५ धावा - बेन डकेट (इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर, २०२५)
१५६ धावा - काईल कोएत्झर (स्कॉटलंड विरुद्ध बांगलादेश, नेल्सन, २०१५)
१४५ धावा - अँडी फ्लॉवर (झिम्बाब्वे विरुद्ध भारत, कोलंबो, २००२)
१४३ धावा - हर्षेल गिब्ल, (दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड, जोहान्सबर्ग, २००९)
जोश इंग्लिस ऑस्ट्रेलियासाठी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वोच्च धावांची खेळी करणारा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. त्याने ऍडम गिलख्रिस्टला मागे टाकले आहे. तसेच तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करणारा शेन वॉटसन, रिकी पाँटिंग यांच्यानंतरचा ऑस्ट्रेलियाचा तिसराच खेळाडू ठरला आहे.
ऑस्ट्रेलियासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वोच्च धावांची खेळी करणारे यष्टीरक्षक१२० नाबाद धावा - जॉश इंग्लिस (विरुद्ध इंग्लंड, लाहोर, २०२५)
९२ धावा - ऍडम गिलख्रिस्ट (विरुद्ध वेस्ट इंडिज, मुंबई, २००६)
५६ धावा - टीम पेन (विरुद्ध भारत, सेंच्युरियन, २००९)
शेन वॉटसन
ग्लेन मॅक्सवेल
डेव्हिस वॉर्नर
बेथ मुनी
जॉश इंग्लिस