महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिरात स्वच्छता मोहिम सुरू करण्यात आली आहे. महाशिवरात्रीनिमित्त महादेव नगरी सजविण्याची तयारी सुरु आहे. लाखो भाविक महाशिवरात्रीला भिमाशंकर मंदिरात येतात.
Nagpur Live : पाकविरुद्ध सामन्यात भारतीय संघ जिंकण्यासाठी साकडं, मुख्य चौकात केलं मोठं होम हवनपाकिस्तान विरुद्ध सामन्यात भारतीय संघ जिंकावा यासाठी साकडं घालण्यात आलं आहे. नागपुरातील खामला चौकात होम हवन पूजा करण्यात आली आहे. बजरंगबलीच्या मंदिरात साकडं घालत, भारतीय टीमसाठी हवन, आणि पुजा अर्चा करण्यात आली.
Yawatmal Live: 20 लाखांचा मद्यसाठा जप्त, उत्पादन शुल्क विभागाची कारवाईयवतमाळमध्ये वीस लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. तसंच याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
Live Update: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या कार्यालयात पोहोचल्यादिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या कार्यालयात पोहोचल्या
नरेंद्र मोदी यांचा दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारीत होणारा मन की बात हा संवादात्मक कार्यक्रम यापुढे मुंबईतल्या आर्थर रोड कारागृहात दाखवला जाईल - मंगलप्रभात लोढापंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारीत होणारा मन की बात हा संवादात्मक कार्यक्रम यापुढे मुंबईतल्या आर्थर रोड कारागृहात दाखवला जाईल- कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा.
Live: यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत असल्यानं खूप आनंद होत आहे - कौशल इनामदारयंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत असल्यानं खूप आनंद होत आहे - कौशल इनामदार
Live: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी उत्साही वातावरणाचं दर्शनभारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी उत्साही वातावरणाचं दर्शन घडवत भारतीय क्रिकेट चाहते भारत आणि पाकिस्तानच्या ध्वजांच्या रंगात रंगवतात
Live: पंतप्रधान मोदींचा 'मन की बात' कार्यक्रम आर्थर रोड कारागृहात दाखवला जाईल: कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढापंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारीत होणारा मन की बात हा संवादात्मक कार्यक्रम यापुढे मुंबईतल्या आर्थर रोड कारागृहात दाखवला जाईल- कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा.
- साहित्य संमेलनात आलेले ठराव हे प्रक्रियेत आहेत - नीलम गोऱ्हे
- बीड मध्ये झालेल्या हत्याच निषेध
- पक्षानं टाकलेला विश्वास सार्थ करत जबाबदारी स्वीकारली
- बरेच लोक आमच्या कडे येथील ते त्यांचे अनुभव सांगतील
Live: श्रीशैलम बोगद्यात अडकलेले ८ कामगार सुरक्षित बाहेर, भारतीय सैन्याची मदततेलंगणामधील श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनाल बोगद्यात अडकलेल्या ८ कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारतीय सैन्यानं बचाव कार्यात सहभाग घेतला.
PM Modi Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बिहारमधील भागलपूरमध्ये पीएम-किसान योजनेचा १९ वा हप्ता जारी करणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बिहारमधील भागलपूरमध्ये पीएम-किसान योजनेचा १९ वा हप्ता जारी केला जाईल.
- देशभरातील ९.८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना २२,००० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा थेट हस्तांतरण.
Kolhapur live: मराठा आरक्षण आंदोलनाची नवी रणनीतीकोल्हापुरात आज मराठा समाजाच्या 42 प्रमुख संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. राज्यभरातील मराठा संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर असून, शासकीय विश्रामगृहात ही बैठक पार पडत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाज पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत असून, या बैठकीत पुढील आंदोलनात्मक दिशा ठरवली जाणार आहे. आरक्षणासंदर्भात सरकारकडून अपेक्षित निर्णय न मिळाल्यास मोठ्या स्तरावर आंदोलन उभारण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
600 रुपयांत होणाऱ्या कामांसाठी बीडच्या आरटीओ अधिकाऱ्यांच्या नावाने एजंटाने 10हजार रुपये मागितले. त्यातील 8 हजार रुपये घेताना एजंटाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई बीड शहरातील बशीरगंज चौकात करण्यात आली. दरम्यान, पकडल्यानंतर एजंटाने पळून जाण्याचा प्रयत्न केला.अब्दुल रहीम अब्दुल मजीद असे पकडलेल्या एजंटाचे नाव आहे.
वडगाव शेरीत वार्षिक यात्रा सुरू असताना टोळक्याने मध्यरात्री वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविल्याची घटना घडली.
याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
वडगाव शेरीतील ग्रामदेवतेची दोन दिवस यात्रा होती. यात्रेत टोळके आरडाओरडा करत निघाले होते. त्या वेळी रस्त्याने आरडाओरडा करत निघालेल्या टोळक्याला ऋषीकेश पवळे यांनी हटकले.
शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास टोळके कुरकुटे हॉस्पिटलजवळील गल्लीत शिरले. त्यांच्याकडे दांडकी होती.
शिवीगाळ करुन टोळक्याने वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली.
टोळक्याने दोन रिक्षा, तसेच दहा ते बारा दुचाकींची तोडफोड केली. तोडफोडीनंतर परिसरात घबराट उडाली.
पसार झालेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी दिली
Pune Live : येत्या दोन दिवसांत कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय घेणार- रविंद्र धंगेकरपुण्यातील काॅंग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी पक्ष सोडण्याचा चर्चांचवर मौन सोडले आहे. रविंद्र धंगेकर म्हणाले की, येत्या दोन दिवसांत कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय घेणार आहे.
PM Modi Live : आज पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच बागेश्वर धामला भेट देणारपंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बागेश्वर धामला भेट देणार असून , कर्करोग रुग्णालयाची पायाभरणी करणार करणार आहेत.
Pune Live : कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी चालकाला मारहाणीचे पुण्यात पडसाद, कानडी बसेसवर फासलं काळंबेळगावीमध्ये कन्नड भाषा न बोलणा-या महाराष्ट्राच्या एसटी चालकाला मारहाण करुन काळं फासण्यात आलं होतं त्यानंतर या घटनेचे महाराष्ट्रात पडसाद उमटू लागले आहेत. पुणे शहरातील स्वारगेट परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत कानडी नंबरप्लेट असलेल्या बसेसला काळं फासले आहे.