कधी काळी राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्या प्रेमसंबंधांबद्दल बरेच चर्चिले जात असे.
नव्वदच्या दशकात तरुण राजे ठाकरे नेते आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री यांची कथित प्रेमकहाणी चर्चेचा विषय होती.
90 च्या दशकात राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्यात घनिष्ठ संबंध होते, असे अनेकदा म्हटले गेले आहे.
सोनाली बेंद्रेच्या चित्रपटसृष्टीतील वाटचालीत राज ठाकरेंनी मोठी मदत केली होती, असेही बोलले जाते.
राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांनी कधीच आपल्या नात्याबाबत खुलासा केला नाही किंवा त्यावर भाष्य केले नाही.
मात्र, त्यांच्या जवळिकीबाबत वारंवार चर्चा रंगायच्या.
सोनाली बेंद्रेचा आग हा पहिला चित्रपट पाहिल्यानंतर राज ठाकरे तिच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले होते, असे म्हटले जाते.
मायकल जॅक्सन भारतात परफॉर्म करण्यासाठी आला असताना, सोनाली बेंद्रे राज ठाकरे यांच्यासोबत विमानतळावर त्याचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होती, यावरून त्यांच्या नात्याबद्दल अंदाज बांधला जातो.
त्या घटनेच्या फोटो आणि व्हिडिओंनी त्यावेळी मोठी चर्चा निर्माण केली होती.
मायकल जॅक्सनला रिसीव्ह करण्यासाठी राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे पारंपरिक वेशभूषेत पोहोचले होते.
राज ठाकरे यांनी कुर्ता-पायजमा आणि नेहरू जॅकेट परिधान केले होते, तर सोनालीने मराठमोळी साडी नेसून गजरा घातला होता.
लग्न झाल्यानंतरही राज ठाकरे सोनालीबद्दल आकर्षित होते, असे बोलले जायचे.
राज ठाकरे सोनालीशी विवाह करायचा विचार करत होते, मात्र त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना तसे करण्यास मनाई केली.
बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दुसरे लग्न करण्यापासून परावृत्त केले होते, अशी चर्चा होती.
त्यांच्या राजकीय भवितव्यावर याचा नकारात्मक परिणाम होईल आणि चुकीचा संदेश जाईल, असे बाळासाहेब ठाकरे यांचे मत होते.
राज ठाकरे यांच्यासोबतच्या नात्यातील दुराव्यानंतर सोनाली बेंद्रेने तिच्या फिल्मी करिअरवर लक्ष केंद्रित केले आणि 2002 मध्ये दिग्दर्शक-निर्माता गोल्डी बहलसोबत लग्न केले.